
लोकशासन-प्रतिनिधी:माळशिरस ग्रामीण
दहिगाव हायस्कूल दहिगाव येथे ७९ वा स्वातंत्र्य दिन १५ ऑगस्ट २०२५ रोजी मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. इयत्ता दहावी बॅच सन १९९९-२००० चे गेट-टुगेदर हे उमेश पाटील यांच्या संकल्पनेतून मधुर मिलन या ठिकाणी २५ मे २०२५ रोजी संपन्न झाले होते. त्यावेळी विद्यार्थ्यांनी शाळेसाठी काहीतरी करावे असे संकल्पना पुढे आली होती त्यावेळी विद्यार्थ्यांनी एक वर्ग खोली बांधून द्यायचे ठरवले होते. सर्व विद्यार्थ्यांनी मिळून वर्गखोली शाळेला बांधून दिली.
त्याची कोनशीला अनावरण १५ ऑगस्ट २०२५ स्वातंत्र्य दिनी मोठ्या उत्साहाने गावातील जेष्ठ मंडळी मोहन जाधव, पोपट चिकणे, मोहन किर्दक, मच्छिंद्र फुले, दादा पवार, बबन पाटील, लालासो किर्दक, महादेव सावंत,मानसिंग पाटील, सूर्याजी फुले इ. तसेच संस्थाचालक वंदना देवी मोहिते, वनिता पाटील,माजी आमदार राम सातपुते, मुख्याध्यापक विलास चव्हाण सर, ढोबळे सर, पाटील सर सर्व शिक्षक व विद्यार्थी यांच्या उपस्थितीत कोनशीला अनावरण वर्ग खोलीचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी इयत्ता -दहावीचे १९९९-२००० चे विद्यार्थी – विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. निलेश फुले यांनी कोणत्याही कामाची सुरुवात स्वतःपासून करून एक नवीन आदर्श विदयार्थी व गावा समोर ठेवला. त्यानंतर सर्वात शेवटी १२०० विद्यार्थ्यांसाठी बॉक्स पॅकिंग करून खाऊ वाटप करण्यात आले. यामध्ये जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी ,अंगणवाडी विद्यार्थी आणि हायस्कूल मधील विद्यार्थी तसेच गावातील उपस्थित गावकऱ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. आणखीही शाळेसाठी मदत करण्याचे माननीय सर्व शिक्षक यांनी आपल्या भाषणातून सांगितले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धनाजी ढगे, सचिन किर्दक, निलेश फुले, स्वरूप गांधी, उमेश पाटील, बंडू फुले, विराज पाटील, जितेंद्र पवार, किरण शिंदे, विष्णू केंदळे, संजय पाटील, राणी गोडसे, उज्वला किर्दक, सारिका पवार, विजया मंगरुळे तसेच १९९९-२००० चे सर्व विद्यार्थ्यांनी योगदान देऊन कार्यक्रम यशस्वी केला. सदर बॅचच्या विद्यार्थ्यांनी अशीच एकी कायम ठेवणार असे आश्वासन देखील दिले.