
लोकशासन-उपसंपादक:गणेश गुप्ते ,इंदापुर
भवानीनगर: (दि.२०) श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्यावरती स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी गाळप हंगाम २४-२५ ला ऊस घालणाऱ्या सभासदांना दिवाळीला ३०० रुपये हप्त्याची मागणी केलेली आहे सभासद हा आर्थिक अडचणीत असताना कारखान्याने सभासदांना मदत करावी ही एकच भावना यावेळी स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
कारखान्याचे उत्तम व्यवस्थापन व नियोजन चालू आहे कामगारांना व सर्वांना योग्य न्याय दिला जातो मग सभासद त्यामध्ये पाठीमागे का त्यासाठी ज्या सभासदांनी गेली दहा वर्ष दराचा तोटा सहन केला आहे त्याला या आर्थिक गर्थेतून बाहेर काढण्यासाठी व भविष्यामध्ये आपल्याच कारखान्याला ऊस पुरवठा करण्यासाठी त्याला उद्युत करण्यासाठी ३०० रुपये दराची मागणी केलेली आहे.
संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये हा प्रस्ताव ठेवून यावर सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन कारखान्याच्या वतीने कार्यकारी संचालक अशोक जाधव यांनी दिलेले आहे याप्रसंगी स्वाभिमानीचे युवा प्रदेशाध्यक्ष अमरसिंह कदम जिल्हा सचिव राजेंद्र सपकळ इंदापूर तालुका अध्यक्ष बाबासाहेब झगडे उपाध्यक्ष विशाल भोईटे संघटक मनोज घोळवे सोशल मीडिया प्रमुख राहुल घोळवे पुणे जिल्हा खजिनदार नितीन घोळवे शिवाजी रुपनवर सागर घोळवे बापूराव घाडगे गणेश गायकवाड औदुंबर आव्हाड कृष्णा कदम भागवत मुळीक संदीप सपकळ वसंतराव देवकाते व सभासद उपस्थित होते.