
लोकशासन-प्रतिनिधी:पुणे ग्रामीण
पुणे ग्रामीण: इंदापूर तालुक्यातील शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असलेल्या हर्षवर्धन पाटील यांचा २१ आक्टोंबर रोजी वाढदिवस असल्याने हर्षवर्धन पाटलांच्या कार्यकर्त्यांन कडून इंदापूर तालुक्यात बॅनर लावले आहेत मात्र पाटलांच्या कार्यकर्त्यांन कडून हर्षवर्धन ज्या पक्षाचे नेते आहेत व २०२४ ची विधानसभा त्यांनी ज्या पक्षाचे उमेदवार म्हणून लढवली आज २१ आक्टोंबर रोजी हर्षवर्धन पाटलांच्या बॅनर वरून त्याच पक्षाचे तुतारी चिन्हासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते व खुद्द शरद पवारच गायब असल्याचे दिसून आले.
इंदापूर तालुक्यातील राजकारण लोकसभा निवडणुकी पुर्वी पासुन सातत्याने एखाद्या चातक पक्षा प्रमाणे कोणत्या राजकीय पक्षा भोवती घिरट्या घालत आहे.यामध्ये अनेक नेते मंडळी आपली घरटी शोधत असताना हर्षवर्धन पाटील मात्र कोणत्या तरी एका घरट्यात २०१९ पासून स्थिरस्थावर होताना दिसत नाहीत.
२०१९ साली काॕंग्रेस चा हात सोडून इंदापूर तालुक्यात भाजप चे कमळ फुलवू पाहणारे हर्षवर्धन पाटील २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत मात्र शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची तुतारी फुकतांना दिसले.मात्र हि फुंकर देखील कमीच पडली.२०१९ मध्ये अजित पवार आणि भरणेंना कंटाळून भाजप मध्ये गेलेल्या हर्षवर्धन पाटील यांची २०२४ मध्ये खुद्द अजित पवारांची राष्ट्रवादीच महायुती मध्ये सामील झाली यावेळी दत्तात्रय भरणेंनी देखील अजित पवारांची साथ दिली.त्यामुळे हर्षवर्धन पाटलांची अवस्था “सासुपायी वाटणी केली आणि सासुच वाटणीला आली” अशी झाली.
२०२४ च्या विधानसभेत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची तुतारी फुंकून देखील पाटलांना मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले.विधानसभा निवडणुकी नंतर पाटील मात्र शरद पवारांच्या राष्ट्रवादी रमल्याचे दिसले नाही मात्र दुसरीकडे भारतीय जनता पार्टी कडून देण्यात आलेल्या राष्ट्रीय साखर संघांच्या अध्यक्ष पदाची बिरुदावली मिरवत भाजप सोबत आपली जवळीक असल्याचे सातत्याने दाखवून देण्याचा प्रयत्न पाटील करत असताना दिसुन आले.
सध्या हर्षवर्धन पाटलांच्या वाढदिवसाच्या बॅनर वरुन तुतारी सह शरद पवार व पक्षाच्या नेत्यांचे फोटोच गायब आहेत तर दुसरीकडे हर्षवर्धन पाटलांच्या कार्यकर्त्यांकडून पाटील भाजप मध्ये असतानाचे फोटो लावत त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत असल्याने हर्षवर्धन पाटलांच्या पुन्हा भाजप प्रवेशाच्या चर्चांना पेव फुटले आहे.मात्र हर्षवर्धन पाटलांच्या भाजप पक्ष प्रवेशाला राज्यातून विरोध असल्याची कुजबुज आहे.