विधीमंडळाच्या सार्वजनिक उपक्रम समितीची खोपोली ते कुसगाव या मिसिंगलिंक प्रकल्पास भेट

Spread the love

लोकशासनप्रतिनिधी:संजय शिंदे,पुणे ग्रामीण

पुणे: सार्वजनिक उपक्रम समितीचे अध्यक्ष आमदार राहुल कुल यांच्या नेतृत्वाखाली समितीच्या सदस्यांनी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील ‘खोपोली ते कुसगाव मिसिंग लिंक’ प्रकल्पाचा आढावा घेतला. या भेटीत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड, सह व्यवस्थापकीय संचालक मनुज जिंदल, अधीक्षक अभियंता राहुल वसईकर उपस्थित होते.

मुंबई-पुणे महामार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पामुळे घाटमार्ग टाळता येणार असून, वाहतुकीतील अडथळा कमी होणार आहे. ९ किमी लांबीचा आणि २३ मीटर रुंदीचा बोगदा देशातील सर्वात मोठ्या बोगद्यांपैकी एक ठरणार आहे. तसेच, या प्रकल्पांतर्गत १८५ मीटर उंच पूल बांधण्यात येणार असून, देशातील सर्वात उंच पूल बांधण्याचा विक्रम महाराष्ट्रात नोंदवला जाणार आहे. हे प्रकल्प आणि पूल पूर्ण झाल्यावर मुंबई-पुणे प्रवास अधिक सुलभ व आरामदायी होईल.

महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी समितीला माहिती दिली, की या प्रकल्पाचे ९०% काम पूर्ण झाले असून उर्वरित काम अंतिम टप्प्यात आहे. प्रतिकूल परिस्थितीत देखील अभियंते व कामगार हे काम समर्थपणे पूर्ण करत आहेत, समितीने त्यांच्या कार्याचे कौतुक केले.

समितीच्या सदस्यांमध्ये समिती प्रमुख आमदार श्री. राहुल दादा कुल यांच्या सह आमदार श्री. सुभाष देशमुख, आमदार श्री. नीलेश राणे,आमदार श्री. भीमराव तापकीर, आमदार श्री. हेमंत ओगले, आमदार श्री. मिलिंद नार्वेकर, आमदार श्री. वरुण सरदेसाई, आमदार श्री. रईस शेख यांचा समावेश होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button