देवकर सर यांचे श्री केतकेश्वर विद्यालया साठी मोठे योगदान : राजकुमार जठार

Spread the love

लोकशासन-प्रतिनिधी: इंदापूर ग्रामीण

इंदापूर : (दि.२५) निमगाव केतकी येथील श्री केतकेश्वर विद्यालया मध्ये सुभाष देवकर सर यांचा ऐतिहासिक गौरवशाली निरोप समारंभ संपन्न झाला.या ऐतिहासिक निरोप समारंभास श्री केतकेश्वर विद्यालयामधील १९८५ पासून सेवा करणारे सर्व शिक्षक शिक्षिकांना निमंत्रित करण्यात आले होते.

या निरोप समारंभास अध्यक्ष म्हणून विद्यालयाचे माजी शिक्षक शारीरिक शिक्षण शिक्षक शामराव शिंदे सर तर प्रमुख पाहुणे म्हणून पुणे जिल्हा संस्थेचे अधीक्षक अभंग, डोणजे विद्यालयाच्या मुख्याधिपिका गीतांजली जुन्नरकर, अवसरे सर , शेंडे के एस, शिंदे के एस, शानुर मुलाणी, भाजपचे तालुकाध्यक्ष राजकुमार जठार, माजी सभापती अंकुश जाधव सुवर्ण योगेश्वर पतसंस्थेचे चेअरमन मच्छिंद्र आप्पा चांदणे तंटामुक्ती अध्यक्ष अतुल आप्पा मिसाळ सोमनाथ वाघमोडे राजाबाई देवकर सर्व आजी-माजी शिक्षक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.

निरोप समारंभात मार्गदर्शन करताना भाजपाचे तालुकाध्यक्ष राजकुमार जठार यांनी सांगितले की देवकर सरांनी गेली ३५ वर्ष या शाळेसाठी या संस्थेसाठी अहोरात्र काम केले आहे.आजचा हा सोहळा आपल्यासाठी भावनिक क्षण घेऊन आला आहे. आपल्यातीलच एक अत्यंत मेहनती, निष्ठावान व कर्तव्यपरायण व्यक्तिमत्त्व असलेले आपल्या विद्यालयाचे लेखणीला सुभाष देवकर यांचा निरोप समारंभ आपण साजरा करत आहोत.संपूर्ण ३५ वर्षे देवकर यांनी आपल्या सेवेत घालवली आहेत. ३५ वर्षे – ही केवळ कालगणना नाही, तर शाळेच्या प्रत्येक दप्तरात, प्रत्येक रजिस्टरमध्ये, प्रत्येक कागदपत्रात त्यांचे श्रम, प्रामाणिकपणा आणि शिस्त दिसून येते. त्यांनी केवळ कागदोपत्री काम केले नाही, तर संपूर्ण विद्यालयाच्या शिस्तबद्ध कारभाराला दिशा दिली.आज मी ज्या उंचीवर उभा आहे, त्यात देवकर कुटुंबाचा मोठा वाटा आहे. त्यांच्या घरातील स्नेह, जिव्हाळा आणि साथ मला आयुष्याच्या अनेक टप्प्यांवर प्रेरणा देत आला आहे. खरं सांगायचं तर, आज मी जे काही झालो आहे त्यामध्ये या कुटुंबाचा हातभार अमूल्य आहे. सरांचे हसतमुख व्यक्तिमत्त्व, सर्वांना मदतीला धावून जाण्याची तयारी आणि कामातील अचूकता हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे गूण आहेत. ३५ वर्षे त्यांनी कोणतीही तक्रार न करता, कोणतेही काम लहान-मोठे न मानता, ही शाळा म्हणजे माझं कुटुंबचया भावनेने सेवा बजावली.आज त्यांची सेवा निवृत्ती आपल्याला खिन्न करणारी आहे.पण त्याचबरोबर त्यांच्या तेजस्वी कारकिर्दीचा गौरव करण्याचीही हीच वेळ आहे. त्यांचा हा प्रवास प्रत्येक तरुणासाठी प्रेरणादायी आहे.सर, आपल्या परिश्रमांचा, आपल्या निष्ठेचा व आपुलकीचा सुगंध शाळेच्या प्रत्येक भिंतीत कायम राहील. आपण दिलेलं योगदान शब्दात मांडणं कठीण आहे.आपल्या उत्तम आरोग्यासाठी, आनंदी व समाधानाने भरलेल्या आयुष्यासाठी आम्ही मनःपूर्वक शुभेच्छा देतो.आपण पुढील जीवनप्रवासही अशाच उत्साहाने, आनंदाने व समाधानाने व्यतीत करावा, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य एम.बी भोंग सर, मनोगत संजय हेंद्रे सर तर सूत्रसंचालन किसन भोंग सर यांनी केले तर आभार जाधव डी डी सर यांनी केले हा ऐतिहासिक निरोप समारंभ यशस्वी करण्याचे विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षिका यांनी केले.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8007108688

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button