
लोकशासन-उपसंपादक:गणेश गुप्ते,इंदापुर
इंदापूर तालुक्यातील सणसर ग्रामपंचायत परिसरातील (दलित वस्ती) भाग्यनगर – अशोकनगर वार्ड नंबर -१ वार्ड नंबर -२ या ठिकाणी स्मशानभूमीसाठी निधी देण्यात यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) इंदापूर तालुका अध्यक्ष सामाजिक न्याय विभाग संजय दुपारगुडे, बापू बनसोडे, आबा गुप्ते यांनी निवेदनाद्वारे संसद रत्न बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांना इंदापूर मधील एका कार्यक्रमादरम्यान सुप्रिया सुळे आल्या होत्या त्यादरम्यान केली आहे.
निवेदनात म्हटले आहे गेल्या अनेक वर्षापासून भाग्यनगर अशोकनगर या दोन गावांसाठी एकच स्मशानभूमी आहे.
यादरम्यान अंत्यविधी करण्यासाठी गेल्यास त्या ठिकाणी पाणी साचलेले असते अनेक वर्षापासून त्या ठिकाणी हीच परिस्थिती असून प्रशासनाकडे अनेकदा मागणी करूनही दुर्लक्ष केले जात असून या भागातील ग्रामस्थांना अंत्यविधी करत असताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
त्या ठिकाणी पाण्याची सोय नाही , विजेचे सोय नाही, स्मशानभूमी लगतच कॅनॉल असल्याने अंत्यविधीसाठी येणाऱ्या ग्रामस्थांना आपला जीव धोक्यात घालून कॅनल मध्ये उतरून पाणी आणावे लागत आहे.
तरी त्या ठिकाणीची अडचण लक्षात घेऊन सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून त्या भागातील ग्रामस्थांसाठी निधी देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे.या मागणीचे निवेदन इंदापूर मधील कार्यक्रमात संसदरत्न सुप्रिया सुळे यांना देण्यात आले.