
लोकशासन-उपसंपादक: गणेश गुप्ते,इंदापूर ग्रामीण
भवानीनगर : (दि.२८) इंदापूर तालुक्यातील भवानीनगर -सणसर एसटी स्टँड वरती शेड नसल्याने प्रत्येक स्टॅन्ड वरती छत बसवण्यात यावेत अशी मागणी अशी मागणी उपसरपंच अभयसिंह निंबाळकर व सणसर ग्रामपंचायत सदस्य यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना निवेदनाद्वारे केली आहे.
श्री संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी महामार्ग जी-९६५ या मार्गाच्या लगत असलेल्या वेगवेगळ्या गावामध्ये सोयीसाठी उभारणेत आलेले एसटी स्टँड चे शेड, बांधकामे,अनेक झाडे हटवल्याने ऊन,पाऊसामुळे अनेकांचे हाल होत आहेत.
मार्गाचे रुंदीकरण करताना झाडं मुळे अडथळे होत असल्याने प्रशासनाने ते हटवले आहेत. त्या ठिकाणी शेड नसल्याने शालेय विद्यार्थी व स्थानिक नागरिकांना भर उन्हात व पावसात विना छताचे थांबावे लागत आहे. त्यामुळे विद्यार्थी व स्थानिक नागरिकांनाची गैरसोय विचारात घेत बारामती व इंदापूर महामार्ग लगत असलेल्या गावांमध्ये एसटी स्टँड उभारण्यासाठी शासन स्तरावर निर्णय घेण्यात यावा अशी मागणी अभयसिंह निंबाळकर यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना केली आहे.