
लोकशासन-प्रतिनिधी: इंदापूर ग्रामीण
इंदापूर- भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चाचे सचिव,सरपंच परिषदेचे अध्यक्ष आकाश विलासराव कांबळे यांची भाजपा च्या पुणे जिल्हा ग्रामीण सरचिटणीस पदी एक मताने फेरनिवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीबद्दल संपूर्ण जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्ष होत असून सर्वत्र त्यांचे कौतुक केले जात आहे.
भारतीय जनता पार्टीने एका खेड्या गावातील तरुणाला कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना देखील माझ्यातील धडपड ओळखून मला युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिव पदाची जबाबदारी दिली हि जबाबदारी पार पाडत असताना गेल्या दोन टर्म मध्ये या पदाला साजेसे काम करण्याची संधी मला मिळाली. या कार्यकाळात कधीच पक्षाने दिलेल्या जबाबदारीतून बाहेर पडलो नाही तदनंतर पक्षाने मला कोल्हापूर जिल्ह्याच्या व मोर्चा प्राभारी पदाची जबाबदारी दिली.तेथे ही मी प्रवास करून पक्ष संघटन वाढीकरिता प्रयत्न केले.असे निवडीनंतर बोलताना कांबळे यांनी सांगितले.
पुढे बोलताना ते म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मनातील असणारी संकल्पना म्हणजेच युवा वाॅरियर्स याचा मी पश्चिम महाराष्ट्र संयोजक म्हणून काम करीत असताना समाधान होतेच.युवा वॉरियर्स यामध्ये युवकाचा मोठा मेळावा देखील बारामती या ठिकाणी तत्कालीन प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये मला घेण्याचे भाग्य मिळाले. तसेच पंढरपूर पोटनिवणुक, कोल्हापूर पोटनिवडणूक, गोवा विधानसभा या ठिकाणचा निवडणूक प्रक्रियेत माझा निवासी सक्रिय सहभाग होता.
विविध आंदोलने, पक्षाचे विविध उपक्रम, मन की बात सारखे अनेक विषय यांसारखे कामे करत असताना पक्ष संघटनेत कधीच कोणत्याच कामात चालढकल केली नाही आणि त्याचच फलित म्हणून पक्षाने माझ्यावरती भारतीय जनता पार्टी पुणे ग्रामिणच्या महामंत्री पदाची जबाबदारी माझ्या वरती दुसऱ्यांदा सोपवली आहे.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस, भाजपा महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, भाजपा महामंत्री राजेश पांडे, पुणे जिल्ह्याचे समन्वयक व दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल, भाजपा नेते प्रवीण माने, जिल्ह्यध्यक्ष शेखर वढणे, भाजपा नेते वासुदेव काळे, भाजपा ज्येष्ठ नेते बाळासाहेब गावडे, यांनी फादर बॉडी मध्ये मोठी जबाबदारी देत जो विश्वास माझ्या सारख्या सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीवर दाखवला त्याला नक्कीच मी पुर्ण ताकदीने न्याय देण्याचा प्रयत्न करील व संपूर्ण जिल्ह्यात पक्षाचे काम जोमाने वाढवण्यात माझा मनापासून हातभार लावील असे यावेळी आकाश कांबळे यांनी सांगितले.