
लोकशासन- प्रतिनिधी,इंदापूर ग्रामीण
इंदापूर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात सध्या भोंगळ कारभार सुरू असल्याचे दिसून येत आहे.इंदापुर तालुक्यातील गोतंडी गावातील गोतंडी काटी रस्ता झाडा झुडुपांने वेढला असुन या विषयी भाजप नेते प्रविण माने यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपचे उपाध्यक्ष संदिप माने यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग इंदापूर यांच्या कडे पत्रव्यवहार करून याबाबत माहिती दिली होती.सदरील झाडेझुडपे तातडीने काढणे गरजेचे असताना.पत्रव्यवहार करुन देखील सदरील झुडपे काढली नसल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इंदापूर कार्यालयात संदिप माने यांच्या सह भारतीय जनता पार्टी चे इंदापूर तालुका अध्यक्ष राजकुमार जठार, महामंत्री सुरज पिसे, उपाध्यक्ष सत्यजीत रणवरे हे गेले असता.त्या ठीकाणी कोणतेही अधिकारी उपस्थित नव्हते या वरुन संबंधित अधिकाऱ्यांना फोन वरून माहिती दिली असता दोन दिवसात या रस्त्यावरील झाडेझुडपे काढून रस्ता मोकळा करण्यात येईल असे सांगितले.
यावेळी भारतीय जनता पार्टी चे अध्यक्ष राजकुमार जठार यांनी सांगितले की इंदापूर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत तालुक्यातील जवळपास तीस ते चाळीस किलोमीटर वरील गावे येत असुन अनेक नागरिक या ठिकाणी कामासाठी येत असतात.मात्र या ठिकाणी अनेक खुर्च्या रिकाम्याच दिसत होत्या.वास्तविक पाहता एवढ्या मोठ्या कार्यालयात अधिकारी व कर्मचारी वेळेवर उपस्थित असणे आवश्यक असताना या कार्यालयात कोणीहि जबाबदार अधिकारी असल्याचे दिसून आले नाही.
शासकीय कार्यालयांमध्ये वास्तविक पाहता हालचाल नोंदवही असणे आवश्यक असते.मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इंदापूर कार्यालयात हालचाल रजिस्टर विषयी येथील कर्मचाऱ्यांना विचारले असता याविषयी कर्मचाऱ्यांनाच माहिती नसल्याचे दिसून आले.तर कार्यालयात उपस्थित राहण्यासाठी अधिकाऱ्यांची वेळ व वार सुनिश्चित करणे आवश्यक आहे कि जेणेकरून नागरिकांची गैरसोय होणार नाही.
राजकुमार जठार,अध्यक्ष भारतीय जनता पार्टी,इंदापूर तालुका