
लोकशासन-प्रतिनिधी:इंदापुर ग्रामीण
इंदापुर ( दि.०५ ) – इंदापुर तालुक्यातील गोतंडी काटी रस्त्यावरील काटेरी झुडपामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता.रस्त्याच्या दुतर्फा वाढलेल्या झुडपामुळे वाहतुकीस निर्माण होणारा अडथळा व भीती यामुळे या रस्त्याला प्रवास करणे जिकरीचे ठरत असल्याने या संदर्भात भाजपा नेते प्रवीण माने यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा चे इंदापुर मध्यचे मंडल अध्यक्ष राजकुमार जठार यांच्या नेतृत्वाखाली उपाध्यक्ष संदीप माने यांनी २९ आक्टोंबर रोजी सार्वजनिक बांधकाम विभागा सोबत पत्रव्यवहार केला होता.
या अनुषंगाने ०२ सप्टेंबर रोजी भाजपाचे इंदापुर मध्यचे मंडल अध्यक्ष राजकुमार जठार,महामंत्री सुरज पिसे,उपाध्यक्ष सत्यजीत रणवरे व संदीप माने यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे जाऊन या बाबत जलद कारवाई करण्याची मागणी केली होती.

या पत्रव्यवहार व भारतीय जनता पार्टी च्या पाठपुराव्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागा कडून कारवाई करत या गोतंडी-काटी रस्त्यावरील काटेरी झुडपे काढण्यास सार्वजनिक बांधकाम विभागा कडून तातडीने सुरुवात करण्यात आली.या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात शेतकरी ,विध्यार्थी ,विध्यार्थिनी नागरिक प्रवास करत असल्याने याचा या भागातील लोकांना फायदा होणार आहे.