
लोकशासन-उपसंपादक:गणेश गुप्ते,इंदापूर ग्रामीण
इंदापूर : उद्धट पवारवाडी (ता.इंदापूर) येथे जल जीवन मिशनच्या उत्तर प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेअंतर्गत ठेकेदाराच्या मनमानी कारभारा विरुद्ध उपोषण सलग चार दिवस सुरू असताना या ठिकाणी कार्यकारी अभियंता पुणे जिल्हा यांनी या ठिकाणी येऊन पाहणी करून उपोषणकर्त्यांना भेट दिली.
उद्धट प्रादेशिक पाणीपुरवठा योजना ही बारा गावांची पाणी योजना असून या ठिकाणी उपोषणकर्त्यांनी ठेकेदाराच्या मनमानी कारभार व वर्क ऑर्डर प्रमाणे काम करत नसल्याचे आरोप उपोषणकर्त्यांनी केले होते त्या संदर्भात आज दि १२ रोजी दुपारी महाराष्ट्र जल प्राधिकरण चे कार्यकारी अभियंता श्री नाडगौडा साहेब तसेच त्यांच्याबरोबर इंदापूर तालुका महाराष्ट्र जल प्राधिकरण च्या गरुड मॅडम यांनी या ठिकाणी येऊन उपोषणकर्त्यांशी चर्चा करून मुद्दे सोडवण्याचा प्रयत्न केला परंतु त्या सर्व गोष्टी लेखी स्वरूपात न दिल्याने उपोषणकर्त्यांनी आपले आंदोलन चालूच ठेवले आहे.