
लोकशासन-प्रतिनिधी:संजय शिंदे,ग्रामीण बारामती
बारामती तालुका पोलीस ठाण्यातील एका पोलीस कर्मचारी महिलेला २० हजार रुपयांची लाच घेताना लाचलुबपत प्रतिबंधक विभागाने आज गेहाथ पकडले, टेबल जामीन देऊन अटक न करण्यासाठी या पोलीस कर्मचारी महिलेने लाच मागितली होती. आज दुपारी पोलीस ठाण्यातच लाच स्वीकारताना ही पहिला पोलीस कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात अडकली.दरम्यान बारामती तालुका पोलीस ठाण्याचा कारभार गेल्या काही दिवसात चर्चेत आहे.अशात ही कारवाई झाल्यामुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.
अंजना बिभीषण नागरगोजे (बब ३८, रा. निमिर्ती विहार, रुई, बारामती) असं या महिला हवालादाराचं नाव आहे. याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार, त्यांची पत्नी, सासू, सासरे आणि मेहुण्याबर दि. २ सप्टेंबर २०२५ रोजी बारामती तालुका पोलीस ठाण्यात शारीरिक व मानसिक छळप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. याचा तपास हवालदार अंजना नागरगोजे या करत होत्या.तक्रारदारांना टेबल जामीन देऊन अटक न करण्यासाठी नागरगोजे यांनी एक लाख रूपयांची मागणी केली होती. तडजोडीअंती २० हजार रुपये देण्याची मागणी नागरगोजे यांनी केली होती. याबाचत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे फोनद्वारे तक्रार केली.
या तक्रारीची पडताळणी करून पोलीस ठाण्यातच २० हजारांची लाच घेताना अंजना नागरगोजे बांना सगेहाथ पकडण्यात आले. या प्रकरणी नागरगोजे यांच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक अजित पाटील, अर्जुन भोसले, सहाय्यक पोलीस उपअधीक्षक दयानंद गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सर्वदा सावळे व त्यांच्या पथकाने ही कारचाई केली.
यावेळी शासकीय कर्मचारी, अधिकारी यांनी शासकीय कामासाठी कोणत्याही प्रकारच्या लाचेची मागणी केल्यास मो.९८२३१३७१५४/९०२९०३०५३० नंबर ९४०३७८१०६४ या नंबर बरती संपर्क साधण्याचे आवाहन शिरीष सरदेशपांडे पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांनी केले आहे. या कारवाईनंतर पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. महिला पोलीसाकडून पोलीस ठाण्यातच लाय स्विकारण्याचा प्रकार समोर आल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.