
लोकशासन-प्रतिनिधी:संजय शिंदे,ग्रामीण इंदापूर
कळसगाव येथील श्री क्षेत्र धाकट्या पंढरपूर विठ्ठल वाडी येथील युवा शेतकरी निलेश खारतोडे यांना कृषिरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.कळसगाव येथील श्री क्षेत्र धाकट्या पंढरपूर विठ्ठल वाडी प्रगतशील शेतकरी निलेश सोपान खारतोडे यांना उत्कृष्ट ऊस उत्पादक शेतकरी म्हणून ट्रॉफी व प्रशस्त पत्र देऊन सन्मानित करण्यात आले राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या शुभ हस्ते खारतोडे यांना राज्यस्तरीय पुरस्काराने गौरवण्यात आले.
यावेळी दादासाहेब फाळके पुरस्कार प्राप्त उज्जैन चे महाकाल भक्त श्रीमंत डॉक्टर श्रीकांत दास धुमाळ महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती. श्री एस एज्युकेशन फाउंडेशन च्या वतीने विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या कर्तुत्वान व्यक्तींचा व संस्थांचा राज्यतरी पुरस्कार सन्मान सोहळा शिक्षक दिनाचे औचित्य साधून ७ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आला होता.
यावेळी मुंबई महानगरपालिका सहाय्यक आयुक्त महादेव शिंदे चेअरमन एस एच सावंत उपस्थित होते.महाधन कंपनीचे सारथी शेतकरी श्री. निलेश सोपान खारतोडे उत्कृष्ट शेती महाधन कंपनीच्या नियोजन पद्धतीने खतांचा वापर करून वेगवेगळे पिके तसेच ऊस सिताफळ केळी डाळिंब पिकामध्ये भरघोस उत्पन्न घेत याची दखल घेउन कृषिरत्न हा पुरस्कार देण्यात आला.