महिलेच्या गळ्यातील सोने हिसकवणाऱ्या दोन तरुणांना वालचंदनगर पोलीसांनी केले अटक

Spread the love

लोकशासन-प्रतिनिधी:संजय शिंदे,ग्रामीण इंदापूर

इंदापूर- काझड ता. इंदापुर गावचे हददीत मध्ये सिंधु काशिनाथ नरूटे, (वय ६० वर्षे) रा.मौजे काड़ाड, ता. इंदापुर, जि. पुणे या त्यांच्या राहते घराजवळील आर्या किरणा जनरल स्टोअर्स या दुकानामध्ये असताना अज्ञात दोन इसम हे त्यांच्या दोन चाकी युनिकॉर्न गाडीवरुन दुकानामध्ये आले त्यावेळी सदर दोन चाकी गाडीवरील एक इसम हा गाडीवरुन उतरुन दुकानामध्ये जावुन किरणा सामान घेण्याच्या बहाणा करुन सिंधु नरुटे या किराणा सामानाचा हिशोब करीत असताना सदर महिला ही दुकानामध्ये एकटी आहे याचा फायदा घेवुन त्यांच्या गळयामध्ये असलेले सोन्याचे मनिमंगळसुत्र हिसका मारुन तोडुन लबाडीच्या इरादयाने जबरी चोरी करुन त्यांच्याकडील मोटार सायकलवरुन बसुन काझड गावातील अंर्तगत रोडने पसार झाले होते.

सदरची घटनेची माहिती मिळाल्यानंतर घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने वालचंदनगर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर २९०/२००५ वी एन एस कलम ३०९ (४), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.सदर घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने तपास करत असताना गुन्हामधील दोन तरुणांनी वापरलेल्या दोन चाकी गाडी तसेच फिर्यादी व साक्षिदार यांच्याकडुन घेतलेल्या अज्ञात इसमांचे वर्णन या वरुन गुन्हयाचा तपास करत असताना मौजे भवानीनगगर, काड़ाड, बोरी, लाकडी, लिंबोडी तसेच बारामती तालुकामधील रुई, सावळ, काटेवाडी, कन्हेरी यागावांमध्ये असलेले जवळपास १०० सी.सी.टी.व्ही फुटेजची पाहणी केली. त्यावेळी तपासादरम्यान फिर्यादी व साक्षिदार यांनी दिलेल्या वर्णनाप्रमाणे गुन्हामधील इसम हा गुणवडी, ता. बारामती येथील असलेबाबत माहिती मिळाली.

त्यानंतर सदर इसम हा बारामती मध्ये येणार असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झालेनंतर मिळालेल्या माहिती प्रमाणे सदर इसमास मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी जावुन शिताफीने पकडून ताब्यात घेवुन त्यास त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव १) रोहित विजय बोरकर, (वय २१ वर्षे) रा.गुणवडी, ता. बारामती, जि. पुणे असे सांगितले.त्यानंतर सदर गुन्हयाच्या तपासाच्या अनुषंगाने त्यास वालचंदनगर पोलीस स्टेशन येथे आणुन त्याला विश्वासामध्ये घेवुन तपास केला असता त्याने सदरचा गुन्हा हा त्याचा साथिदार नामे रोहित ऊर्फ कोच्या दिपक कुदळे, रा. बांदलवाडी, ता. बारामती. जि.पुणे याला सोबत घेवुन केला असल्याचे सांगितले. त्यानंतर सदर गुन्हयाच्या अनुषंगाने आरोपी रोहित विजय बोरकर, वय २१ वर्षे, रा. गुणवडी, ता. बारामती, जि. पुणे व रोहित ऊर्फ कोच्या दिपक कुदळे, वय २० वर्षे, रा. बांदलवाडी, ता. बारामती. जि.पुणे या दोघांना तपासाच्या अनुषंगाने अटक केली असुन न्यायालयाने दोन्ही आरोपींना दिनांक ११ सप्पटेंबर पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.

गुन्हयाच्या तपासा दरम्यान आरोपी कडुन गुन्हामधील वापरलेले दोन चाकी वाहन, तसेच जबरी चोरी मधील सोने, रोख रक्कम, मोवाईल अशा वर्णनाचा मुददेमाल हा जप्त करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा तपास हा वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली मिलींद मिठापल्ली, पोलीस उप-निरीक्षक, वालचंदनगर पोलीस स्टेशन हे करत आहेत.

सदरची कामगिरी मा. संदीपसिंह गिल्ल सो, पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, मा. गणेश बिरादार सो, अपर पोलीस अधीक्षक बारामती विभाग, व मा.डॉ सुदर्शन राठोड, उपविभागीय पोलीस अधिकारी, बारामती विभाग यांचे मार्गदर्शनाखाली वालचंदनगर पोलीस स्टेशनचे सपोनि राजकुमार डुणगे, पोलीस उप निरीक्षक मिलींद मिठापल्ली, पोलीस हवालदार गुलाबराव पाटील, शैलेश स्वामी, जगदीश चौधर, सतिष फुलारे, विक्रमसिंह जाधव, गणेश वानकर, रणजित देवकर, अभिजीत कळसकर यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button