गांजा विकणाऱ्या दोघांना अटक ! बेकायदा गांजाची विक्री करणाऱ्या व्यक्तीवर निमसाखर येथे छापा टाकून वालचंदनगर पोलिसांनी दोघांना केली अटक.

Spread the love

लोकशासन-प्रतिनिधी:इंदापूर ग्रामीण

वालचंदनगर : इंदापूर तालुक्यातील निमसाखर येथे बेकायदा गांजाची विक्री करणाऱ्या दोन तरुणांनवर वालचंदनगर पोलिसांन कडून कारवाई करण्यात आली आहे.याप्रकरणी वालचंदनगर पोलिसांन कडून शुभम वामन निगडे (वय २४, रा. निरवांगी) व अक्षय बाळासाहेब कदम (वय २८, रा. कुरबावी, ता. माळशिरस, जि. सोलापूर) यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.सदरील इसमां कडून दोन किलो गांजा वालचंदनगर पोलिसांन कडून जप्त केला आहे.

निमसाखर गावच्या हद्दीमध्ये शुभम निगडे हा गांजा आणून विक्री करत असल्याची माहिती वालचंदनगर पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी निमसाखर गावच्या हद्दीमध्ये बारामती कळंब-बावडा-नरसिंहपूर (बी.के.बी.एन.) रस्त्यावर सापळा रचला. यावेळी कळंब कडून निमसाखर गावच्या दिशेने दुचाकीवरून गांजा घेऊन आलेल्या शुभम निगडे वर छापा टाकून कारवाई केली. निगडे यांच्याकडून चौकशी केली असता त्याने अक्षयकडून गांजा विक्रीसाठी आणत असल्याचे सांगितले.पोलिसांनी या दोघांना अटक केली असून इंदापूर न्यायालयाने दोघांना हि ९ सप्टेंबर पर्यंत पोलिस कोठडी दिली आहे.

सदरील कामगिरी पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल, अप्पर पोलिस अधीक्षक गणेश बिरादार व उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली वालचंदनगर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे, उपनिरीक्षक विजय टेळकीकर, पोलिस हवालदार गुलाब पाटील, शैलेश स्वामी, गणेश काटकर, विकास निर्मळ, सचिन जमदाडे, अभिजित कळसकर, विक्रमसिंह जाधव, गणेश वानकर, किरण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button