
लोकशासन-प्रतिनिधी:इंदापूर ग्रामीण
जंक्शन : आनंदनगर,ग्रामपंचायत (ता. इंदापूर) मधील रहिवासी शशिकांत गेजगे हे गेल्या वर्षभर पासून या परिसरामध्ये असणारा मोबाईल टॉवर काढण्यासंदर्भात पाठपुरावा करत आहेत.दाट वस्तीच्या परिसरामध्ये हा मोबाईल टॉवर आहे. रेडिओफ्रिक्वेन्सी इलेक्ट्रॉमॅग्नेटीक फिल्डच्या दीर्घकाळ संपर्कामुळे नागरी आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो आहे.
पत्र व्यवहार केल्यानंतर ग्रामविकास अधिकारी यांच्याकडून या टॉवर चे समर्थन करत नसल्याचे दि. 20/9/24 च्या पत्राद्वारे कळविण्यात आले होते.ग्रामविकास अधिकारी यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे टॉवर काढन्यासंदर्भात मार्गदर्शन मागितले होते.यावरती संबधितांशी पत्रव्यवहार करण्यात यावा व आपल्या पातळीवरती निर्णय घेण्यात यावा असे गटविकास अधिकारी यांच्याकडून दि. 29/4/2025 च्या पत्राद्वारे ग्रामपंचायत ला कळविण्यात आले होते.परंतु यावरती ग्रामविकास अधिकारी यांच्याकडून कोणती ही ठोस कारवाई केल्याचे दिसत नाही.

यानंतर ग्रामविकास अधिकारी यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.फोन न उचलणे, विविध कारणे देणे अशा प्रकारे वर्तन ग्रामविकास अधिकारी काळे यांच्याकडून करण्यात आले.वरील सर्व बाबींमुळे कर्तव्यामध्ये कसूर करणाऱ्या ग्रामविकास अधिकारी यांचा सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.परंतु ग्रामविकास अधिकारी हे रजेवर असल्याने व कोणताही ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित नसल्याने ग्रामपंचायत कार्यालय बंद होते.
यावेळी ग्रामपंचायत कार्यालयाच्या पायऱ्यांवरती शशिकांत गेजगे यांच्याकडून सत्काराचे साहित्य ठेवण्यात आले. सदर विषयात 15 दिवसाच्या आत कोणताही सकारात्मक निर्णय न घेतल्यास वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करणार असल्याचे गेजगे यांच्याकडून सांगण्यात आले आहे.