
लोकशासन-उपसंपादक:गणेश गुप्ते,इंदापूर
भवानीनगर : (ता.१६) संपूर्ण महाराष्ट्रात सध्या परतीच्या पावसाने जोर धरला असून सततच्या पडणाऱ्या पावसामुळे शेतकरी व सामान्य जनतेच्या दैनंदिन कामात अडथळा येऊ लागला आहे.काहीसा अश्याच प्रकारच्या अडथळ्याचा सामना आज इंदापूरच्या प्रशासकीय कार्यालयात कामासाठी आलेल्या नागरिकांना करावा लागत होता.
दि.१५ सप्टेंबर रोजी झालेल्या पावसाने प्रशासकीय कार्यालयाच्या छतावरील पाणी खाली सोडण्यासाठी टाकलेला पाईप प्रवेशद्वाराजवळच फुटल्याने छताचे पाणी प्रवेशद्वाराजवळील पोर्च मध्ये साठल्याने काही काळ नागरिकांना कसरत करतच पाण्यातून वाट काढत जावे लागत होते.पाण्यातून कसरत करत जाव्या लागणाऱ्या नागरिकांमधून प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाबाबत संताप व्यक्त होत होता.
यावेळी कार्यालयात उपस्थित आखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे उपाध्यक्ष दिलावर तांबोळी यांनी सांगितले कि, प्रशासकीय कार्यालयातील पोर्च मध्ये साठलेल्या पाण्यातून वाट काढत जावे लागणाऱ्या नागरिकांची विशेषतः जेष्ठ नागरिकांची तारांबळ होत आहे. कार्यालयात असणाऱ्या मऊ फारशीवरून चालताना नागरिकांना जीव मुठीत घेऊन जा-ये करावी लागत आहे, तरी माझी प्रशासकीय प्रमुख तहसीलदार यांना विनंती आहे कि त्यांनी जातीने लक्ष देऊन छताच्या पाण्याची विल्हेवाट लावणाऱ्या पाण्याच्या पाईप ची त्वरित दुरुस्त करण्यासबंधी सूचना संबंधिताना देऊन नागरिकांची गरसोय टाळावी.