भिगवण सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यक्षेत्राच्या बाहेर ! Not Reachable

Spread the love

लोकशासन-प्रतिनिधी: इंदापूर ग्रामीण

भिगवण :(ता.०३) शासना कडून नागरीकांच्या सोईसाठी नागरिकांचा वेळ व पैसा वाचुन सरकारी कार्यालयातील हेलपाटे कमी झाले पाहिजेत या दृष्टीने मेल,फोन वाॅटसअॕप वरून कामे करण्यासाठी पाऊले उचलली जात असताना सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासन मात्र जाणीव पूर्वक नागरिकांना वेठीस धरत असल्याचे दिसून येत आहे.एका बाजूला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भिगवण कार्यालयात कर्मचारी अधिकारी साडे अकरा वाजले तरी उपस्थित नसल्याचे दिसून आले तर दुसरीकडे काही अधिकारी जन माहिती अधिकारीच गायब असल्याचे दिसून आले.तर दुसरे अधिकारी आपला संपर्क नंबरच द्यायला तयार नाहीत त्यामुळे प्रशासना कडून जाणीव पूर्वक कामात काटकसर केली जात असल्याचे दिसून येत आहे.

भिगवण (ता.इंदापुर) येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात सकाळी साडे दहा वाजता भारतीय जनता पार्टी चे महामंत्री सुरज पिसे व उपाध्यक्ष सत्यजीत रणवरे पोहचले असता या ठिकाणी एक हि अधिकारी उपस्थित नसल्याचे निदर्शनास आले.या नंतर जन माहिती अधिकारी यांना पिसे यांनी साडे अकरा वाजता फोन केला असता.सदरच्या अधिकाऱ्यांने ना फोन उचलला, ना कार्यालयात उपस्थित होते तर साडे आकरा वाजता याच कार्यालयातील एक अधिकारी कामा वरती हजर झाले.मात्र या अधिकाऱ्याने आपला संपर्क नंबर देणं टाळले.

वास्तविक पाहता सार्वजनिक बांधकाम विभाग भिगवणच्या कार्यक्षेत्रात जवळपास ४० किलोमीटर पर्यंतचा भाग येत असुन ग्रामीण भागातील नागरिकांना या कार्यालयात येणे अडचणीचे ठरत असते.त्यातच अधिकाऱ्यांच्या अशा विपरीत वागणुकीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button