
लोकशासन-प्रतिनिधी:इंदापूर ग्रामीण
इंदापुर : (ता.०२) कांदलगाव (ता.इंदापुर) येथील ग्रामपंचायत कार्यालयात महात्मा गांधी जयंती व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पुजन करुन अभिवादन करून जयंती साजरी करण्यात आली.भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसा निमित्ताने महिलांना १५ दिवसाचे शिलाई मशीन प्रशिक्षण मोफत ठेवण्यात आले.
राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसा निमित्त मोफत १५ दिवस महिला साठी शिलाई मशिन प्रशिक्षण दिल्याची माहिती भाजपा इंदापूर महिला अध्यक्षा प्रमिला राखुडे यांनी दिली.
यावेळी ग्रामविकास अधिकारी रामेश्वर साठे. मच्छिंद्र काशीद, रामा डोके, दिगंबर ननवरे, सिद्धेश्वर कोळी, निलेश राखुंडे, शिलाजीत सोनवणे, मधुकर भोसले, सुर्यकांत राखुंडे व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.