
लोकशासन-प्रतिनिधी: इंदापूर ग्रामीण
वालचंदनगर : (ता.०१) इंदापुर तालुक्यात गेली काही दिवसा पासून होत असलेल्या पावसामुळे शेतातील मका पिक धोक्यात आले आहे.
सध्या महाराष्ट्रासह इंदापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असून यामुळे शेत पिके व जनावरांच्या चाऱ्यासाठी च्या पिकांचे नुकसान झाले असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
निमसाखर (ता.इंदापुर) येथील युवा शेतकरी विक्रम ज्ञानेश्वर रणवरे यांच्या २ एकर शेतातील मका पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असुन यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे.शेतकऱ्यांचे पावसामुळे अतोनात नुकसान झाले असुन शासनाने शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी विक्रम रणवरे यांनी केली आहे.