
लोकशासन- उपसंपादक:संजय शिंदे,इंदापूर ग्रामीण
भिगवण : (ता.१) इंदापूर तालुक्यातील मदनवाडी येथील संजय हनुमंत सकुंडे यांची भारतीय जनता पार्टीच्या इंदापूर तालुका चिटणीस पदी वर्णी लागली आहे.
मंगळवार ( ता.३०) रोजी इंदापूर येथील राधिका हॉल येथे इंदापूर भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पदाधिकारी नियुक्ती पत्र कार्यक्रमात भारतीय जनता पार्टीचे पुणे जिल्हा अध्यक्ष शेखर वढणे यांच्या हस्ते व पुणे जिल्हा परिषदेचे मा.बांधकाम व आरोग्य सभापती प्रविण माने, कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा.सभापती मयुर पाटील,भारतीय जनता पार्टीचे इंदापूर तालुका अध्यक्ष तेजस देवकाते व पक्षाचे ज्येष्ठ नेते मारुती वणवे आदी पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थित त्यांना हे नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
निवडीनंतर बोलताना सकुंडे यांनी सांगितले की, देशातील सर्वात मोठ्या अशा भारतीय जनता पार्टी पक्षाचा पदाधिकारी झाल्याचा मला सार्थ अभिमान असून आगामी काळात पक्ष संघटन वाढवून पक्षाचे ध्येयधोरणे तळागाळातील सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचवत तालुक्यात पक्षाची अधिकची ताकद वाढवण्याबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या लोकप्रिय योजना ग्रामीण भागात पोचवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. .