
लोकशासन-प्रतिनिधी: इंदापूर ग्रामीण
श्री क्षेत्र बाबीर देवस्थान रुई येथे देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या ७५ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने सेवा पंधरावडा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता, महाराष्ट्रासह देशभरातील लाखो भाविक त्या परिसरामध्ये येत असतात, तेथे भारतीय जनता पार्टी पुणे जिल्हा महामंत्री आकाश कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरूवात झाली.
यावेळी श्री बाबीरनगरी ऑक्सिजन पार्क मध्ये वृक्षारोपण करण्यात आले, व मंदिर परिसरात स्वच्छता करण्यात आली, यावेळी पुणे जि.भाजपा व्यापारी आघाडीचे अध्यक्ष प्रविण कुमार शहा, भाजपा इंदापूर तालुका महामंत्री तानाजी मारकड,ओबीसी सेलचे जिल्हा मा.सचिव आबासाहेब थोरात, भाजपा जिल्हा सोशल मीडिया सहसंयोजक अमोलजी प्रभुणे, भाजपा इं.उपाध्यक्ष वैभव लावंड, चिटणीस अविनाश मोहिते,सलीमभाई मुलाणी, सचिन लावंड, सामाजिक कार्यकर्ते राजू पाळेकर, देविदास लावंड,मा.उपसरपंच दिपक साळुंखे, जय हनुमान बहुउद्देशीय संस्थेचे महिमती मोहिते,आदी उपस्थित होते.
भारतीय जनता पार्टी प्रथम राष्ट्र नंतर पार्टी आणि शेवट मी या तत्त्वानुसार चालणारी जगामध्ये सर्वाधिक सदस्य संख्या असणारी एकमेव पार्टी म्हणून भारतीय जनता पार्टी चा उल्लेख केला जातो, देशाचे कर्तबगार पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या लोककल्याणकारी अलौकिक कार्याचा गौरव जगामध्ये होत आहे, महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी महाराष्ट्राच्या विकासाच्या संदर्भात अनेक आश्वासक लोक कल्याणकारी निर्णय घेतलेले आहेत.
यामुळे भारतीय जनता पार्टीची लोकप्रियता जनमानसात वाढत आहे पार्टी लोककल्याणकारी उपक्रम राबवत आहे, त्यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम राबवण्यात आला,