
लोकशासन-प्रतिनिधी: इंदापूर ग्रामीण
निमसाखर-गुरुवार दिनांक २५ सप्टेंबर २०२५ रोजी ग्रामऊर्जा फाऊंडेशन व निर्माण बहुउद्देशीय विकास संस्था पुणे यांच्या माध्यमातून इंदापूर कार्यक्षेत्रातील निमसाखर या गावातील निर्माण बहुउद्देशीय विकास संस्था, पुणे संचलित सावित्रीची शाळा मधील मुला मुलींना पिण्याच्या पाण्याच्या बॉटल वाटप करण्यात आले.
यावेळी निमसाखर ग्रामपंचायतीचे मा.सरपंच गोविंदराव रणवरे,भारतीय जनता पार्टी चे उपाध्यक्ष सत्यजीत रणवरे,आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक संघटनेचे अध्यक्ष लालासाहेब चव्हाण,सुनील शेळके,शाळा व्यवस्थापन समिती चे महादेव दळवी,निर्माण संस्था पुणे जिल्हा समन्वयक रवी पवार उपस्थित होते.
मुलांच्या आरोग्यासाठी पाणी हा महत्वाचा घटक असला तरी मुलांना शुद्ध आणि मुबलक पाणी मिळायला हवे. तसेच मुले शाळेत जाताना पाण्याची प्लास्टिक बॉटल घेऊन जातात त्या मुळे मुलांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्लास्टिक हे आपल्या शरीरासोबत पृथ्वी साठी पण घातक असल्याने मिल्टन या कंपनीची बॉटल मुलांना देण्यात आली. या बॉटल मध्ये पाणी आहे त्या स्थितीत राहून पिण्यायोग्य पाणी मुलांना मिळेल.ज्या मध्ये गरम आणि गार पाणी आपण घेऊन जाऊ शकतो.
निमसाखर गावात या संस्थेच्या माध्यमातून एकूण ७० मुले शिक्षण घेतात त्या सर्वांसाठी पाणी बॉटल उपलब्ध करून दिल्यामुळे मुलांसोबत त्यांच्या पालकांनी देखील आनंद व्यक्त केला.यावेळी पालकांनी व मुलांनी संस्थेचे चे आभार मानले.