लोकशासन-उपसंपादक:गणेश गुप्ते,इंदापूर
भवानीनगर : (ता.२४) इंदापूर व बारामती आगाराच्या बसेस गेल्या काही दिवसांपासून शेवटच्या घटका मोजत असुन या महिन्यांमध्ये इंदापूर बारामती महामार्गावरती तब्बल पाच वेळा बसेस बंद पडलेल्या आहेत. यामुळे प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.परिवहन मंत्रांनी याकडे गांभीर्यपूर्व लक्ष द्यावे अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे.
”ग्राहक हा राजा असतो” असे म्हटले जाते मात्र याच ग्राहकाला सेवा घेत असताना नादुरुस्त बसेसमुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी अंथुर्णे (ता.इंदापुर) या ठिकाणी दुपारच्या वेळी बस बंद पडली होती.त्यानंतर जाचकवस्ती (ता.इंदापुर) याही ठिकाणी बस बंद पडली होती.त्यानंतर काटेवाडी ते भवानीनगर यादरम्यान आज दि (२३) रोजी बस बंद पडली त्यामुळे प्रवाशांना रस्त्याच्या कडेला आधार घ्यावा लागला.तर पावसाळ्याचे दिवस असल्याने अनेक प्रवाशांनी प्रवासाचे तिकीट काढलेले असताना खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागला.मात्र ही परिस्थिती कधी सुधारणार असा सवाल प्रवासी करू लागले आहेत.”भीक नको पण कुत्र आवर”अशी वेळ प्रवाशांवर आली आहे.अशा प्रकारच्या नादुरुस्त बसेस आगारामधून सोडण्यात येऊ नयेत अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे.