
लोकशासन-उपसंपादक:गणेश गुप्ते,इंदापूर
भवानीनगर : (ता.२३) दिनांक २२ रोजी सकाळी ठीक १०:०० वा स्वर्गीय गणपतराव सपकाळ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड.सकळवाडी तालुका.इंदापूर जिल्हा.पुणे वार्षिक सर्वसाधारण सभा आज संपन्न झाली या सभेमध्ये एक ते नऊ विषय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये मंजूर करण्यात आले संस्थेने ९% डिव्हीडंट सभासदांना देण्यासाठी सचिव सपकळ,संजय सपकळ यांनी डिक्लेअर केले.
संस्थेचे चेअरमन अर्चना महेश सपकळ व सचिव संजय बापूराव सपकळ त्याचबरोबर अजित कल्याण सपकळ,शिवाजी सोपान सपकळ,गोपाळराव सपकळ, नंदकिशोर सपकळ,शिवराज सपकळ,जमादार सपकळ, धनंजय सपकळ, रामभाऊ बोबडे, नवींद्र सपकळ, हनुमंतराव वाघमारे,बापूराव थोरात सर्व सभासद व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या सभेमध्ये वालचंदनगर येथील शेतकरी कुटुंबातील उद्योगपती सन्माननीय.उत्तम दादा फरतडे तसेच बापूराव मारोतराव यादव विशेष करून उत्तम दादा फरतडे यांनी शंभर देशांमध्ये आपला प्रवास अभ्यासपूर्ण केला व बापूराव यादव यांनी अमेरिकेला जाण्याचा अभ्यासपूर्ण दौरा केला त्याबद्दल सपकळवाडी गावांमध्ये भाऊसाहेब सपकळ व वसंतराव जगताप व ग्रामस्थ यांच्यावतीने सन्मानचिन्ह शॉल श्रीफळ आणि हार देऊन गावकऱ्यांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला.