
लोकशासन-प्रतिनिधी:संजय शिंदे,इंदापूर ग्रामीण
इंदापुर:(ता.०६) भारतीय जनता पार्टीच्या इंदापूर तालुका चिटणीसपदी राजेंद्र गोडसे यांची निवड करण्यात आली .मी राजेंद्र सर्जेराव गोडसे भारतीय जनता पार्टीचा कट्टर कार्यकर्ता आहे मी २०१४ पासून पक्षाचे सक्रिय काम करत आहे मी भारतीय जनता पार्टीचा इंदापूर तालुका पश्चिम मंडळ चिटणीस पदी पक्षाने माझी नेमणूक केलेली आहे.
त्या पदाला न्याय देण्यासाठी मी परत प्रयत्नाची पराकाष्टा करणार आहे मी या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण पुणे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष शेखर वढणे महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य ज्येष्ठ नेते मारुतराव वनवे तालुकाध्यक्ष तेजस देवकाते व भारतीय जनता पार्टी चे नेते प्रवीण माने या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष वाढीसाठी काम करणार आहे आणि या तालुक्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून कसे येतील त्यासाठी प्रयत्न करणार असे राजेंद्र गोडसे यांनी सांगितले.