पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसा निमित्त मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय पुणे आणि भारतीय जनता मजदूर सेल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर पार

Spread the love

लोकशासन-प्रतिनिधी,पुणे

पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त, मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय पुणे आणि भारतीय जनता मजदूर सेल यांच्या संयुक्त विद्यमाने मौजे निंबुत (ता.बारामती, जि. पुणे) येथे भव्य मोफत आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर भव्यदिव्य पद्धतीने पार पडले.या शिबिरात ग्रामीण जनतेसाठी सर्वसमावेशक आरोग्यसेवा पुरविण्यात आली.

पुणे: (ता.०७) पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त, मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय पुणे आणि भारतीय जनता मजदूर सेल यांच्या संयुक्त विद्यमाने मौजे निंबुत (ता. बारामती, जि. पुणे) येथे भव्य मोफत आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर भव्यदिव्य पद्धतीने पार पडले.

या शिबिरात ग्रामीण जनतेसाठी सर्वसमावेशक आरोग्यसेवा पुरविण्यात आली. शिबिरात खालील विभागांतील तपासण्या आणि उपचार पूर्णपणे मोफत करण्यात आले

👁️ नेत्र तपासणी व मोतीबिंदू निदान-उपचार
👩‍⚕️ स्त्रीरोग, गर्भाशय मुख कर्करोग, स्तनकर्करोग (थर्मल स्क्रीनिंग व्हॅनद्वारे)
🦷 दंतरोग तपासणी व उपचार
❤️ हृदयरोग, किडनी, मुतखडा, हर्निया, अपेंडिक्स, प्रोटेस्ट ग्रंथी निदान व शस्त्रक्रिया
🦴 हाडांचे आजार व फिजिओथेरपी उपचार
🫁 श्वसन आणि फुफ्फुसाचे आजार निदान व उपचार
🩸 कर्करोग निदान, रक्तचाचण्या आणि आयुर्वेदिक उपचार

या उपक्रमात जवळपास अडीच हजार नागरिकांनी लाभ घेतला, ज्यामध्ये स्त्रिया, शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि कारखाना मजूर यांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता.या शिबिरात खालील नामांकित संस्था व वैद्यकीय महाविद्यालयांचा मोलाचा सहभाग होता


• बी.जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे
• इंटिग्रेटेड कॅन्सर ट्रीटमेंट अँड रिसर्च सेंटर, वाघोली
• एम.ए. रंगूनवाला फिजिओथेरपी कॉलेज आणि डेंटल कॉलेज, पुणे
• महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, जिल्हा पुणे
• पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, बारामती
• हिंद लॅब, ओंकोलाइफ कॅन्सर इन्स्टिट्यूट (तळेगाव दाभाडे)
• शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, बारामती
• स्टेमी इन्स्टिट्यूट, पुणे

या शिबिराचे मुख्य समन्वयक डॉ. मानसिंग साबळे, जिल्हा प्रमुख – मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, पुणे यांनी केलेल्या उत्कृष्ट नियोजनामुळे शिबिर अत्यंत यशस्वी ठरले. त्यांच्या नेतृत्वाखालील वैद्यकीय तज्ञांच्या टीमने सर्व विभागांमध्ये उत्तम सेवा दिली.यामध्ये एकूण २४७० रुग्णांची तपासणी करण्यात आली.

भारतीय जनता मजदूर सेलच्या महाराष्ट्र अध्यक्षा सौ. ज्योतीताई सावर्डेकर यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.त्यांनी संपूर्ण शिबिरादरम्यान उपस्थित राहून जनतेला मार्गदर्शन केले व आरोग्य योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित केले.तसेच राष्ट्रीय सचिव श्री. संजय अग्रवाल, महासचिव सौ. अरुणाताई कवठेकर, आणि महाराष्ट्र उपाध्यक्ष जयेशजी टंक यांचीही उपस्थिती लाभली.

या शिबिराचे प्रमुख आयोजक भारतीय जनता मजदूर सेलचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष श्री. सुरज प्रल्हाद तोडकर आणि बारामती तालुका अध्यक्ष सुजित सर्जेराव काकडे होते. शिबिराच्या यशामध्ये मौजे निंबुत ग्रामस्थांचा मोलाचा सहभाग होता. ज्येष्ठ नेते विजयराव सखाराम काकडे, राजेंद्र काशिनाथ काकडे, महेश काशिनाथ काकडे, उदय नारायण काकडे आणि इतर ग्रामस्थांनी उत्तम समन्वय व जबाबदारी पार पाडली.

या वेळी डॉ.मानसिंग साबळे म्हणाले, या मुख्यमंत्री सामुदायिक आरोग्य शिबिराचा मुख्य हेतू म्हणजे “आरोग्य सर्वांसाठी” ही भावना जनतेपर्यंत पोहोचवणे आणि गरीब, गरजू व ग्रामीण जनतेला विनामूल्य उपचाराची संधी उपलब्ध करून देणे हा होता,जो या शिबिराद्वारे प्रभावीपणे साध्य झाला.त्यांनी उपस्थित सर्व नागरिकांना आरोग्य विषयक मार्गदर्शन केले आणि महिलांमध्ये स्तन कर्करोग आणि गर्भाशय मुखाचा कर्करोग तपासणी करून घेणे किती महत्वाचे आहे हे उपस्थित महिलांना पटऊन दिले.
ग्रामीण भागातील महिलांनी स्वतः पुढाकार घेऊन नेहमी होणाऱ्या कॅन्सर तपासणी शिबिरामध्ये स्वतः ची तपासणी करून घेतली पाहिजे. दिवसेंदिवस महिलांमध्ये स्तन कर्करोग आणि गर्भाशय मुखाचा कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे.
आपण स्वतः हून तपासणी करून घेतली तर लवकरच आजार चे निदान होऊन त्यावर उपचार घेता येऊ शकतात आणि आजार गंभीर होण्यापासून आपला बचाव होऊ शकतो.

या उपक्रमामुळे मौजे निंबुत परिसरात आरोग्य जागरूकतेचा संदेश पसरला आणि समाजसेवेचा सुंदर आदर्श निर्माण झाला.

बातम्या व जाहिराती करीता संपर्क : 8007108688

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button