
लोकशासन-प्रतिनिधी:इंदापूर ग्रामीण
इंदापूर :(ता.०७) भारतीय जनता पार्टीचे पुणे जिल्हा महामंत्री,रूई बाबीरनगरी चे सुपुत्र, मा.सरपंच डॉ आकाश विलासराव कांबळे यांना काल नवी-दिल्ली येथे झालेल्या पदवीदान समारंभात politics from EURO ASIAN UNIVERSITY (USA)ने ‘डॉक्टरेट, ही पदवी बहाल करण्यात आली.अत्यंत दिमागदार सोहळ्यामध्ये झालेल्या पदवीदान समारंभामध्ये देश-विदेशातील मातब्बर वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असणारे मान्यवर सहभागी झाले होते.या दिमागदार सोहळ्यामध्ये ज्येष्ठ अभिनेते राहुल रॉय व युनिव्हर्सिटी कॉन्सलर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आकाश कांबळे यांना सन्मानित केले
डॉ आकाश कांबळे यांच्या कार्याचा अल्प परिचय
आकाश कांबळे हे व्यक्तिमत्व नेहमी सकारात्मक विचार करून, समाजातील सर्व घटकांना बरोबर घेऊन, प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी होऊन, आपल्या जिवाभावांच्या लोकांच्या प्रेमाने आपले राजकीय पटलावर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करत आहे, एक सर्वसामान्य कुटुंबातील युवक रुई गावच्या सरपंच पदाच्या रेस मध्ये काय उतरतो, आणि त्याच्या दुर्दम्य इच्छा शक्तीने जनतेच्या आशीर्वादाने सरपंचपदी त्यांच्या सौभाग्यवती विराजमान होतात,मग ध्येयवेडा तरूण लोकांच्या भल्यासाठी कल्याणासाठी अहो-रात्र झपाटून काम करतो, एक कर्तुत्वान तरुण म्हणून त्यांच्या कार्याची महंती आजही गावातील सर्वसामान्य नागरिक गात आहेत.
‘भारतीय जनता पार्टीच्या मुशीत हा उद्याचा तरुणांचा नेता परिपक्वपणे घडतोय,आणि आगामी काळामध्ये आपल्या कर्तुत्वाच्या जोरावर सर्वसामान्यांसाठी कार्यरत राहण्याची खूणगाट मनाशी बांधतोय आशा कर्तुत्वाच्या परिसिमा रुंदावत असताना हा गौरव म्हणजे त्यांच्यासाठी नवी जबाबदारीच आहे.त्यामुळे त्यांची जबाबदारी नक्कीच वाढली आहे, त्यांचा कायद्यांचा अभ्यास सुरू आहे, गोरगरीब सामान्य माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी लढण्यासाठी लवकरच विधी क्षेत्रामधील शिक्षण ते पुर्ण करत आहेत.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 80070108688