
लोकशासन-प्रतिनिधी: क्राईम
वालचंदनगर – दिनांक ०९ आक्टोंबर २०२५ रोजी दुपारी भरणेवाडी (ता.इंदापुर) गावच्या हद्दीमध्ये जंक्शन-कळस रोडच्या पूर्व बाजूला साधारण २०० फूट अंतरावरील गोल्फ मैदाना मध्ये एका अनोळखी पुरुषाचे प्रेत आढळून आलेले असुन अद्याप पर्यंत त्याची ओळख पटली नाही. सदर व्यक्तीचे वय वर्षे अंदाजे ४५ ते ५५ वर्षे असल्याचे दिसून येत आहे.आपल्या संपर्कातील अथवा माहिती मधील कोणी व्यक्ती बेपत्ता असल्यास वालचंदनगर पोलीस स्टेशन सोबत संपर्क साधावा अथवा माहिती द्यावी असे आवाहन वालचंदनगर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक राजकुमार डुणगे यांनी केले आहे.