
लोकशासन-प्रतिनिधी:संजय शिंदे,इंदापूर ग्रामीण
बारामती : बारामती तालुका पोलीस ठाणे हददीमध्ये दि .०९/१०/२०२५ रोजी रात्री ८/४५ वा चे सुमा मौजे जळोची एम.आय.डी.सी रोडवरती जय शंकर पॉनशॉपचे समोर रोडलगत गुन्हयातील फिर्यादी हे जय शंकर पॉन शॉप येथे थांबले असताना त्या ठिकाणी १) जयेश बाबासाहेब माने वयः २० वर्षे, २) प्रथमेश बाळू गवळी वयः २० वर्षे रा. बन्हाणपुर ता. बारामती जि. पुणे, ३) विनोद गणेश जाधव रा. तांदुळवाडी ता. बारामती जि. पुणे, इतर अनोळखी ०४ इसम यांनी मोटारसायकल वरून येवुन फिर्यादी यांना तु” गणेश धुळाबापु वाघमोडे याचे सोबत का फिरत होता तु माझी माफी असे म्हणत असताना यातील आरोपी अ.क. ०२ प्रथमेश गवळी याने तु याला माफी मागायला लावू नको आज याला ठेवायचे नाही असे म्हणुन त्याचेकडील कोयत्याने फिर्यादी यांना जिवे ठार मारण्याचे उददेशाने मारहाण केली तसेच त्यांचेकडील कोयता हावेमध्ये फिरवुन आम्ही येथील भाई आहे असे म्हणुन त्या ठिकाणाहून निघुन गेले.
सदर गुन्हयाचे गांभीर्य ओळखुन मा. पोलीस अधिक्षक सो, संदिपसिंह गिल्ल यांनी सदर गुन्हयातील आरोपी यांना तात्काळ अटक करण्याचे सुचना दिले नंतर मा. पोलीस निरीक्षक सोो, अविनाश शिळीमकर, स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामिण, तसेच मा. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव सोो, बारामती तालुका पोलीस स्टेशन यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथक तयार करून यातील आरोपीत यांचा शोध घेत असताना तपास पथक यांना तांत्रिक माहितीचे आधारे तसेच बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, सदर गुन्हयातील पाहिजे आरोपी १) जयेश बाबासाहेब माने वयः २० वर्षे, २) प्रथमेश बाळू गवळी वयः २० वर्षे रा. बन्हाणपुर ता. बारामती जि. पुणे, हे अहिल्यानगर येथील रूई छत्तीशी गावामध्ये लपुन बसले आहेत. माहिती प्राप्त झाल्याने तपास पथक यांनी अहिल्यानगर या ठिकाणी जावुन शिफाइतीने आरोपी यांना ताब्यात घेण्यात आले असुन त्यांना सदर गुन्हयाचे तपास कामी अटक करण्यात आले आहे. तसेच सदरची कामगिरी मा. संदिपसिंह गिल्ल, पोलीस अधिक्षक पुणे ग्रामिण, मा. गणेश बिरादार अपर पोलीस अधिक्षक बारामती विभाग पुणे ग्रामिण, मा. सुर्दशन राठोड उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती विभाग बारामती, मा. अविनाश शिळीमकर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामिण, यांचे मार्गदर्शनाखाली मा. चंद्रशेखर यादव मा. पोलीस निरीक्षक बारामती तालुका पोलीस स्टेशन, विक्रम पवार सहा. पोलीस निरीक्षक बारामती तालुका पोलीस स्टेशन, पोलीस उप निरीक्षक अमोल कदम बारामती तालुका पोलीस स्टेशन, ग्रेड पोलीस उप निरीक्षक बाळासाहेब कारंडे, स्था.गु. शाखा पुणे ग्रामिण, सहा फौज एस.जे वाघ, पो.हवा खारतोडे/८२८, पो. हवा स्वप्नील अहिवळे स्था. गु. शाखा पुणे ग्रामिण, पो. शि होळंबे / १६७४ यांनी केली असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास विक्रम पवार सहा. पोलीस निरीक्षक बारामती तालुका पोलीस स्टेशन हे करीत आहेत.