
लोकशासन- प्रतिनिधी:संजय शिंदे,इंदापूर ग्रामीण
इंदापूर : जिल्हा परिषद व पंचायत समिती आरक्षण सोडत जाहीर झाली यामध्ये भिगवन-शेटफळगडे गटाला जिल्हा परिषदेचे सर्वसाधारण स्त्री व पंचायत समितीचे सर्वसाधारण स्त्री अशा प्रकारचे आरक्षण पडले या आरक्षणासोबतच इच्छुकांची देखील नावे हळूहळू समोर येत आहेत यामध्ये पराग जाधव,अजिंक्य माडगे,हनुमंत बंडगर,तुकाराम बंडगर,तेजस देवकाते, प्रवीण वाघ, कुंडलिक बंडगर, स्वप्निल बंडगर अशी नावे समोर येत असतानाच आता मात्र मदनवाडी परिसरात एक नवं नाव समोर येत आहे ते म्हणजे हर्षवर्धन अनिलराव ढवळे. अनेक सामाजिक उपक्रम राबवून कार्यरत असणारे हे नाव शेतकऱ्यांच्या सुखदुःखात अग्रेसर असून त्यांच्यासाठी नेहमी कार्यरत असते.
शेतकरीपुत्र म्हणून त्यांची एक वेगळी ओळख मदनवाडी परिसरात आहे.दत्तात्रय भरणेंचे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून गेले अनेक वर्ष ते काम करत आहेत त्यांच्या माध्यमातून दत्तामामांचा वाढदिवस दरवर्षी सामाजिक उपक्रमाने केला जातो. कौटुंबिक राजकीय पार्श्वभूमी पाहिला गेले तर त्यांचे चुलते प्रकाशबापू ढवळे हे कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे यापूर्वी दहा वर्ष संचालक म्हणून कार्यरत राहिले आहेत त्याच्या माध्यमातून त्यांचा व या कुटुंबाचा पंचक्रोशीतील सर्व नागरिकांपर्यंत दांडगा संपर्क आहे.गेली अनेक वर्ष ढवळे कुटुंब राजकीय पदापासून वंचित राहिलेले असताना आता मात्र या कुटुंबामध्ये हर्षवर्धन अनिल ढवळे यांच्या नावाने राजकीय पद भूषवत का व दत्तामामा त्यांना न्याय मिळवून देतात का? हे मात्र उत्सुकतेच ठरणार आहे.
याबाबतीत हर्षवर्धन ढवळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी पक्ष ज्या ठिकाणी संधी देईल त्या ठिकाणी आत्मीयतेने काम करनार असल्याचे व मिळालेल्या संधीचे सोनं करून दाखवणार असल्याचे म्हटले. त्यांनी यावेळी विश्वास व्यक्त केला की ज्याप्रमाणे दत्ता मामा भरणे म्हणतात की कोणत्याही गोष्टीसाठी माझ्याकडे पुढे पुढे करण्याची गरज पडत नाही माझं लक्ष सर्वांवर असतं प्रत्येकाला न्याय देण्याचं काम हे पक्षाच्या माध्यमातून नक्कीच केलं जाईल.मात्र दत्तात्रय भरने यांनी डावलले तर इतर पक्ष त्यांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करू शकतात असेही बोलले जात आहे.
हर्षवर्धन ढवळे हे वकिलीचे शिक्षण घेतलेले उच्चशिक्षित असून त्यांची नाळ सर्वसामान्यांशी असल्याने त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेत संधी मिळावी अशी अपेक्षा मदनवाडी परिसरातील नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.