
लोकशासन– प्रतिनिधी:पुणे ग्रामीण
इंदापूर – (ता.१७) हिंदू धर्मातील सर्व सणा मध्ये अन्य साधारण महत्त्व असलेला सण म्हणजे दिवाळी आनंदाचा,प्रकाशाचा मंगलमय दिपावली सण संपूर्ण देशात साजरा होत आहे.
- यावेळी भारतीय जनता पक्ष ओबीसी मोर्चा पुणे जिल्हाध्यक्ष गजानन वाकसे व अन्य पदाधिकाऱ्यांकडून आशा स्वयंमसेवीकांना गोड फराळ,साडी व पंत्याचा संच देवून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.कोरोना महामारी पासून ते प्रत्येक व्यक्तीच्या घरोघरी जाऊन आरोग्याबद्दल जनजागृती करण्यापर्यंत या आशाताई पुर्ण वेळ लोकांची सेवा करतात.म्हणून महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंञी मा.चंद्रकांत (दादा) पाटील व युवा आमदार म. राहूल (दादा) कुल साहेब यांच्या सहकार्यातून तसेच प्रदेश महामंञी मा.राजेश (दादा)पांडे आणि जिल्हाध्यक्ष मा.शेखर वढणे यांच्या मार्गदर्शनात हा उपक्रम पार पडला.
हा कार्यक्रम लासुर्णे आरोग्यकेंद्रात पार पडला,या वेळी आरोग्य अधिकारी डाॅ.लब्धी शहा,औषध निर्माण अधिकारी मा.अमोल पवार,श्री.गौरी चव्हाण सुपरवायझर,मा.पांडुरंग सुळ,मा.राहुल ननवरे,मा.सुरज रासकर,मा.दिपक रूपनर,मा.सहदेव सरगर,मा.देविदास बोराटे,मा.सिकंदर मुलानी या सह अन्य पदाधिकारी व परिसरातील आशा ताई उपस्थित होत्या.