
लोकशासन-प्रतिनिधी: इंदापूर ग्रामीण
इंदापूर : संपुर्ण देश दिवाळी साजरी करत असताना आपल्या आसपासचा परिसर लक्ष दिव्यांनी उजळून निघतो.परंतू आजही काही कुटुंब आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी शेकडो मैइल प्रवास करून कामाच्या शोधात फिरत आहेत.अशा कुटुंबांतील लहान मुले,तरूण मंडळी अशा सनावाराला सुध्दा खडतर परिस्थितीत जगत आहेत.
हिच व्यथा जाणून घेऊन भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना सुचणा केल्या की आपले पदाधिकारी हि दिवाळी भटकंती करणाऱ्या कुटुंबांतील सदस्यांच्या पालावर साजरी करतील म्हणून.याच प्रेरणेतून भाजपा ओबीसी मोर्चा पुणे जिल्हाध्यक्ष गजानन वाकसे व त्यांच्या सहकार्यानी इंदापूर तालुक्यातील मौजे जंक्शन येथे उसतोडनी साठी यवतमाळ,नंदुरबार,धुळे,मालेगाव या ठिकाणाहून आलेल्या भिल्ल समाज आदिवासी कुटुंबाला दिवाळी फराळाचे वाटप केले.लहान मुलांना फटाके वाटले
यावेळी पदाधिकाऱ्यांनी पालाच्या आसपासचा परिसर स्वच्छ केला,पालाच्या समोर दिवे पेटवले.या ठिकाणी ३० कुटुंब उतरली असून येथे ४० हुन अधिक लहान मुले आहेत.यांना कोणतीही कल्पना नसताना अचानक दिवाळी फराळ व फटाके पाहून या चिमुकल्यांचा आनंद गगनात मावत नव्हता.
भाजपा प्रदेश महामंञी राजेश पांडे,भाजपा चे पुणे जिल्हाध्यक्ष शेखर वढणे,व दौड तालुक्याचे आमदार राहुल कुल साहेब यांनी या उपक्रमास मार्गदर्शन केले.
यावेळी उपस्थित पांडुरंग सुळ, सतिश सरगर,तुकाराम वाडकर,जंक्शन गावचे पोलीस पाटील दशरथ बनकर,देवीदास बोराटे,राहुल ननवरे,सहदेव सरगर,दिपक रूपनवर,रणजीत पांढरे,रामभाऊ वाडकर या सह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.