
लोकशासन-प्रतिनिधी:संजय शिंदे,इंदापूर ग्रामीण
इंदापूर : स्वर्गीय शंकरराव नारायण सोट पाटील बहुउद्देशीय संस्था मदनवाडी ता. इंदापुर व महा एनजीओ फेडरेशन यांच्या वतीने रविवारी ( दिनांक १९ ऑक्टोबर ) समाजातील गोरगरीब, गरजू व वंचित लोकांना दिवाळी फराळ वाटप करण्यात आला. दिवाळी फराळ वाटप करणे मागचा संस्थेचा हेतू असा होता की, समाजातील अशी अनेक कुटुंब आहेत की ते दिवाळी साजरी करू शकत नाही अशा कुटुंबांना संस्थेने दिवाळी फराळ वाटप करून त्यांचा आनंद द्विगुणित केला.
ही संस्था अनेक समाज उपयोगी कार्यक्रम वेळोवेळी राबवत असते असे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुरज सोट पाटील यांनी’ लोकशासन’ शी बोलताना सांगितले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य हनुमंत नाना बंडगर, कर्मयोगी कारखान्याचे संचालक विश्वास देवकाते, संपत बंडगर, आदर्श सरपंच तुकाराम बंडगर, पत्रकार दादा थोरात, संस्थेचे मार्गदर्शक दिलीप आण्णा सोट पाटील, उपसरपंच अतुल देवकाते, सामाजिक कार्यकर्ते संजय देवकाते, संजय सोट पाटील, नवनाथ नरूटे, निलेश शिंदे, सागर सोट पाटील, धिरज सोट पाटील, सौरभ सोट पाटील, अक्षय सोट पाटील, पत्रकार संजय शिंदे, पत्रकार प्रविण वाघमोडे, तात्या बंडगर संस्थेचे पदाधिकारी यांच्या सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.