
लोकशासन-प्रतिनिधी:इंदापूर ग्रामीण
इंदापूर:(ता.०२) अकलूज येथील सुप्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ एम के इनामदार सर यांच्या हस्ते शेटफळ हवेली (ता. इंदापूर) येथील तलावाचे पुजन करण्यात आले. सकाळी ११ वाजता अकलूज वरून खास शेटफळ तलाव पाहणीसाठी आणि जलपूजन करण्यासाठी डॉ इनामदार सर यांनी शिवसेना ( UBT ) तालुकाप्रमुख नितीन शिंदे यांच्या विनंतीवरून शेटफळ हवेली गावात हजेरी लावली. तलावाचे पुजन करुन डॉ इनामदार यांनी तलावाची माहिती घेतली. त्याशिवाय गावातील भैरवनाथ मंदिरात आणि प्राचीन असलेल्या महादेव मंदिरात दर्शन घेतले.
यावेळी शिवसेना जिल्हा समन्वयक भीमराव भोसले, शिवसेना तालुका समन्वयक अरुण पवार, शिवसेना तालुका संघटक सुदर्शन रणवरे, शिवसेना इंदापूर शहरप्रमुख मे महादेव सोमवंशी, शिवसेना उपतालुकाप्रमुख संदीप चौधरी, विभागप्रमुख अभिजित पाटील, अंकुश गलांडे, रावसाहेब शिंदे, उपशहरप्रमुख बंडु शेवाळे, संतोष क्षीरसागर, उपविभाग प्रमुख विजय तरंगे, सुदर्शन मानेपाटील, वैभव शिंदे, शरद शिंदे उपस्थित होते.
गावात फेरफटका मारल्यानंतर डॉ इनामदार यांनी शिवसेना तालुकाप्रमुख नितीन शिंदे यांच्या निवासस्थानी स्नेहभोजन करुन उपस्थित सर्वांना आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन केले.अकलूज येथील अश्विनी हॉस्पिटलचे सर्वेसर्वा असलेले डॉ एम के इनामदार हे परिसरात रुग्णांसाठी देवदूत म्हणूनच ओळखले जातात. आपल्या बहुमूल्य असलेल्या वेळेतून डॉ इनामदार यांनी नितीन शिंदे यांच्या विनंतीवरून दोन तासांपेक्षा अधिकचा वेळ शेटफळ हवेली गावात दिला. याबद्दल नितीन शिंदे यांनीही डॉ इनामदार यांचे आभार मानले.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क 8007108688