
लोकशासन-प्रतिनिधी:संजय शिंदे,इंदापूर ग्रामीण
इंदापूर : भिगवण येथील भिगवण शिक्षण प्रसारक मंडळ संचलित,लोकनेते शरदचंद्रजी पवार शिक्षणशास्त्र (बी.एड) महाविद्यालयाच्या वतीने ऊसतोड कामगार महिलाना साडी व लहान मुलांना कपडे वाटप करण्यात आले.
या परिसरातील महिला व मुलांना कपडे वाटप केल्याने त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसांडून वाहत होता.साखर कारखान्याचा गाळप हंगाम सुरू झाला असून भिगवण व परिसरात अनेक ऊसतोड मजूर बीड,नगर जिल्ह्यातून दाखल झाले आहेत. जन्मताच कष्टाचा विडा उचललेल्या मजुरांना या बी.एड महाविद्यालयाच्या वतीने दरवर्षी काही ना काही मदत केली जाते.
ऊसतोड कामगार सालाबाद प्रमाणे स्वतःचे गाव सोडून दूरवर ऊसतोडणीसाठी जात असतात दिवसभर उसाच्या फडात राबणारे कुटुंब आणि त्यातच खेळणाऱ्या या मुलांच्या अंगावरील फाटलेली कपडे त्यांच्या परिस्थितीचे वास्तव सांगणारी असतात,अपार कष्ट करूनही पोट भरण्यापलिकडे कसलेही स्थैर्य त्यांना प्राप्त होत नाही.साखर कारखान्यांवरील ऊसतोड कामगारांना त्यांच्या चिमुकल्यांनाही घेऊनच कामाच्या ठिकाणी जावे लागते.अशातच त्या लहान मुलांना आपुलकीची ऊब हवी असते म्हणून, सामाजिक बांधिलकी जपण्याच्या उद्देशाने या महाविद्यालयाकडून कपडे वाटपाचा कार्यक्रम राबविण्यात आल्याचे प्राचार्या डॉ.उज्वला लोणकर यांनी सांगितले.
यावेळी तुषार क्षीरसागर,नवनाथ सावंत,नीलिमा मदने,प्रा.लंबाते, अर्चना खैरे,बाळू होले, गणेश गावडे,राहुल चव्हाण शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8007108688