
लोकशासन : प्रतिनिधी-इंदापूर ग्रामीण
इंदापूर : इंदापूर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शासकीय विश्राम ग्रह या ठिकाणी या ठिकाणी जिल्हाप्रमुख संजय काळे यांच्या प्रमुख उपस्थित इंदापूर नगरपरिषद अध्यक्ष व नगरसेवक या पदांसाठी, निवडणुकीच्या अनुषंगाने शहरातील प्रभाग क्रमांक दोन प्रवीण देवकर, प्रभाग क्रमांक तीन महादेव सोमवंशी, प्रभाग क्रमांक पाच बालाजी पाटील, प्रभाग क्रमांक सहा तेजस्विनी पवार, संतोष शिरसागर, प्रभाग क्रमांक आठ बंडू शेवाळे, प्रभाग क्रमांक दहा पूजा खंडागळे, ज्ञानोबा खंडागळे, या इच्छुक उमेदवारांबरोबर चर्चा करत बैठक संपन्न झाली.
आगामी काळात होऊ घातलेल्या महाराष्ट्रातील नगरपंचायत नगरपरिषद या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी इंदापूर शिवसेना ठाकरे पक्षाने चांगलीच तयारी केली असून यासंदर्भामध्ये काल पीडब्ल्यूडी रेस्ट हाऊस इंदापूर या ठिकाणी शहरातील उपस्थित उमेदवारांबरोबर चर्चा केली सर्व जागा लढण्यासाठी तयारी करत असल्याबाबत सांगितले पुढील नियोजन करण्याकरता दोन दिवसानंतर आणखी शहरांमध्ये नियोजित बैठक होणार असल्याचे सुचित करण्यात आले.
यावेळी शिवसेना ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संजय काळे,महिला आघाडी जिल्हा संघटिका ज्योतीताई गाडे, युवती सेना लोकसभा विस्तारक मृण्मयी लिमये, तालुका प्रमुख नितीन शिंदे, शहर प्रमुख महादेव सोमवंशी, तालुका संघटक सुदर्शन रणवरे महिला गाडी तालुका संघटिका राणता इंगवले, युवासेना तालुका युवा अधिकारी सचिन इंगळे, विभाग प्रमुख दत्ता खुडे अंकुश गलांडे,डॉ बाळासाहेब भोसले, उपविभाग प्रमुख अमित बामणे, हेमंत भोसले, व शहरातील संतोष क्षीरसागर, दादा देवकर, व इतर पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते.