
लोकशासन – प्रतिनिधी:मुंबई
मुंबई : (ता.११) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुख्य उपस्थितीत आज सह्याद्री अतिथीगृह, मलबार हिल, मुंबई येथे कृषी विभागाच्या नव्या बोधचिन्ह आणि घोषवाक्याचं अनावरण करण्यात आलं.
कृषी विभागाचे सध्या बोधचिन्ह सुमारे ३८ वर्षांपूर्वी तयार करण्यात आले होते. या कालावधीत शेतीत तंत्रज्ञान, यांत्रिकीकरण, नैसर्गिक शेती, हवामानबदल आणि उत्पादनाच्या नव्या दिशा अशा अनेक मूलभूत परिवर्तनांच्या पार्श्वभूमीवर विभागाची दृश्य आणि संवादात्मक ओळख अद्ययावत करण्याची गरज निर्माण झाली होती.या उद्देशाने कृषी विभागाने खुली स्पर्धा आयोजित केली होती.
यामध्ये एकूण ७६१ बोधचिन्ह प्रस्ताव आणि ९४९ घोषवाक्य प्रस्ताव प्राप्त झाले. ज्यांपैकी एकाची अंतिम निवड शासनाने केली. ७ नोव्हेंबर २०२५ ला या नव्या बोधचिन्ह आणि घोषवाक्याला कृषी विभागाकडून मान्यता देण्यात आली आणि आज ११ नोव्हेंबर रोजी या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आलं.
बोधचिन्ह स्पर्धेतील विजेते श्री. विरेंद्र भाईदास पाटील (क्रेझी क्रिएशन्स, भुसावळ) आणि घोषवाक्य स्पर्धेतील विजेत्या श्रीमती सिद्धी भारतराव देसाई (परभणी) असून त्यांचं कृषी विभागातर्फे त्यांचे अभिनंदन करण्यात आलं.
यावेळी, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री दत्तात्रय भरणे, मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री गिरीश महाजन, कृषी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, मुख्य सचिव राजेश कुमार, कृषि आयुक्त सुरज मांढरे, उपसचिव प्रफुल्ल ठाकूर, संचालक रफिक नाईकवाडी, कृषी विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्तित होते.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8007108688