
लोकशासन- प्रतिनिधी:इंदापूर क्राईम
वालचंदनगर : इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर निमसाखर (बी.के.बी.एन.) रस्त्या वरती चौदा चाळ जवळ दिनांक १२ नोव्हेंबर रोजी सकाळी ०८:०० च्या सुमारास एक पुरुष जातीचा पाय आढळून आला असून यामुळे परीसरात खळबळ उडाली आहे.घटनेचे गांभीर्य ओळखून वालचंदनगर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे यांनी त्वरित घटनास्थळी भेट देवून तापासाची सुत्रे फिरवली.
वालचंदनगर-कळंब-निमसाखर रस्त्या वरती चौदा चाळ नजीक गायकवाड यांच्या शेता जवळ रस्त्यालाच एक पुरुष जातीचा डावा पाय आढळून आला असून सदरील इसमाचे अंदाजे वय ३५ ते ४५ असण्याची शक्यता आहे.हा पाय एका साखरेच्या पोत्यात घालून आणला असुन हे पोते रस्त्यावर फेकून देण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे.या घटनेची सखोल चौकशी वालचंदनगर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे करीत असुन यावेळी सर्व परीसराची पाहणी करत परीसरातील सर्व शेती,काटेरी झुडपे,संशयीत व निर्जन स्थळांची पाहणी पोलीस कर्मचाऱ्यांन कडून करण्यात आली असून पुढील दिशेने तपासाची दिशा ठरवली जात आहे.
सदरील घटनेची माहिती मिळताच इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास नाळे यांनी घटनास्थळी भेट देत तपासाची चक्रे फिरवण्याच्या दृष्टीने सुचना केल्या आहेत.या विषयी कोणतीही माहिती मिळाल्यास वालचंदनगर पोलीस स्टेशनला कळवण्याचे आवाहन सहाय्यक पोलिस निरीक्षक राजकुमार डुणगे यांनी नाव गुप्त ठेवण्याच्या विश्वासावर दिले.