मा सभापती करणसिंह घोलप यांच्या वाढदिवसा निमित्त विविध कार्यक्रम

Spread the love

लोकशासन- प्रतिनिधी: इंदापूर ग्रामीण

उध्दट : (ता.१३) स्त्रियांविरुद्ध वाढत्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर स्वसंरक्षण ही आजच्या काळाची अत्यंत गरज बनली आहे. हे लक्षात घेऊनउद्‌माई विद्यालय, घोलपवाडी येथे इंदापूर तालुका पंचायत समितीचे माजी सभापती व विद्यमान सदस्य करणभैय्या घोलप यांच्या वाढदिवसानिमित्त “शिका संरक्षण, घडवा परिवर्तन” या विषयावर स्वसंरक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

सदरील कार्यशाळा अॕड.पूजा अविनाश घोलप यांच्या पुढाकाराने आणि Pro Action Self-Defence Academy, पुणे यांच्या सहकार्याने घेण्यात आली.ही संस्था मागील १५ वर्षांपासून पुणे येथे कार्यरत असून, तेथील आयटी कंपन्यांमधील महिला कर्मचारी तसेच शाळा व महाविद्यालयांतील विद्यार्थीनींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देत आहे.आज प्रथमच आपल्या ग्रामीण भागात या संस्थेच्या अध्यक्षा वर्षा पडवळ व निलेश रेणुसे यांनी उपस्थित राहून, तीन तास विविध प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून कृतीप्रधान स्वसंरक्षणाचे धडे दिले.त्यात Palm Heel Strike, Back Elbow Strike, Push Attack, Tugging, Plugging Mountain Position यांसारख्या तंत्रांचा वापर करून संकटाच्या प्रसंगी स्वतःचे संरक्षण कसे करता येईल, हे प्रभावीपणे दाखवून दिले.

या कार्यशाळेस प्रमुख पाहुणे म्हणून थोरातवाडी ग्रामपंचायतच्या सरपंच साधनाताई निकम, तसेच तेजपृथ्वी सामाजिक संघटना, महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या अनिताताई खरात आणि अॕड. पूजा घोलप उपस्थित होत्या.ही कार्यशाळा इंदापूर तालुक्यात प्रथमच आयोजित करण्यात आली असून, ती एक आगळीवेगळी आणि प्रेरणादायी उपक्रम ठरली.या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक सुखदेव माने सर, सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि पालकवर्ग यांनी मोलाचे सहकार्य दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button