
लोकशासन-प्रतिनिधी:संजय शिंदे,पुणे ग्रामीण
लोकशासन- (ता.६ ) बिहार येथील जिल्हा चंपारणचे पोलीस अधीक्षक (खजड) सुशांत कुमार सरोज यांनी दौंड गट क्र.५ येथील सी. कंपनी आणि ई. कंपनी मधील अधिकाऱ्यांना प्रशस्तीपत्र देऊन कौतुक केले. यावेळी पोलीस निरीक्षक आर.डी. होळ, पोलीस निरीक्षक एस. श्री. चौधरी, पोलीस उपनिरीक्षक ए.डी सुतार, पोलीस उपनिरीक्षक एन. बी. लोणकर, पोलीस उपनिरीक्षक डी.ए. कदम पोलीस उपनिरीक्षक एस. एन दाते, पोलीस उपनिरीक्षक ए. आर. जाधव, पोलीस उपनिरीक्षक एस. ई जाधव, सर्व राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक ५ दौड मधील सी व इ कंपनीचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी बिहार विधानसभा निवडणूक २०२५ बंदोबस्तासाठी रवाना केले होते.
या सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी त्यांचे कर्तव्य उत्तम प्रकारे पार पाडून कोणताही अनुचित प्रकार घडून न दिल्याने महाराष्ट्र पोलिसांचे नाव बिहारमध्ये उंचावलेने त्यांचे कौतुक करून त्यांना प्रशस्तीपत्र देण्यात आले आहे. जिल्हा पश्चिम चंपारण (बागाहा) बिहार अंतर्गत विधानसभा निवडणूक २०२५ च्या मतदान कर्तव्यादाम्यान दौंड च्या सैन्याने केलेल्या कामाचे आणि सक्षम मार्गदर्शनाचे, कमांडचे आणि जवळून देखरेखीचे दर्शन मला चांगल्या प्रकारे पाहायला मिळाले असे गौरवोद्दारे पोलीस अधीक्षक सुशांत कुमार सरोज यांनी काढले. २०२५ च्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात मतदानाचे काम मुक्त आणि निपक्षपणे पार पाडणे हे एक कठीण काम होते, परंतु दौड सैन्याच्या कठोर परिश्रमामुळे ते लवकर झाले. या काळात विविध प्रकारची कर्तव्ये पार पाडण्यात अधिकारी आणि सैन्याने दाखवलेल्या समर्पण आणि व्यावसायिकतेचे बारकाईने निरीक्षण बगाहा पोलिसांच्या वतीने करण्यात आले. संपूर्ण टीमचे व सैन्यांचे आभार पोलीस अधीक्षक यांनी मानले. तुमच्या जवानांना, सैन्यांना भविष्यात यश मिळो अशा शुभेच्छा देताना पोलीस अधीक्षक म्हणाले की मी आशा करतो की ते देशाच्या पोलिस, सीएपीएफला अधिक गौरव मिळवून देतील.
संबंधित सर्व अधिकाऱ्यांना प्राप्त झालेले प्रशस्तीपत्रक राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक ५ चे सहाय्यक समादेशक सुनील सरोदे, अशोक बोंद्रे व सचिन डहाळे यांच्याकडून देऊन अधिकारी व अंमलदार यांना गौरविण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने अंमलदार आणि अधिकारी उपस्थित होते.