
लोकशासन – प्रतिनिधी:शंकर जोग,पुणे
लोकशासन : (ता.६) स्वातंत्र्य समता आणि बंधुता हाच धर्म मानणाऱ्या महामानव, भारतरत्न, भारतीय राज्यघटनेची शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे आज महापरिनिर्वाण दिनानिमित्त जगन्नाथ सकट समाज सेवाभावी संस्था आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने
आरपीआयचे मातंग आघाडी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रदीप कांबळे, सुरेश राजगे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहर उपाध्यक्ष किरण जगताप, यांच्या हस्ते पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी जगन्नाथ सकट समाजसेवा भावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष इंद्रजीत सकट, सतीश कांबळे, डॉ तेजस राजगे, अनिल शिंदे, गोपी खेत्रे, शेखर चक्रनारायण, ज्ञानेश्वर मोरे, जेकब डेविड, डेंजिल मेंडोसा, चॅस फर्नांडिस, सादिक शेख, पंढरीनाथ कांबळे, सॅम घंगाळे, आदि यावेळी उपस्थित होते,