
लोकशासन – प्रतिनिधी: इंदापूर ग्रामीण
इंदापूर : (ता.०१) निमसाखर ता.इंदापुर येथील १८ वर्ष सरपंचपद सांभाळलेले माजी सरपंच शिवाजीराव पांडुरंग रणवरे ( वय ९४ ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी , दोन मुले ,दोन मुली नातवंडे,सुना व नात सुना असा परीवार आहे. राजकीय,धार्मिक, शैक्षणिक आणि कृषी क्षेत्रात ही मोठे काम आहे. शिवाजीराव रणवरे यांना निमसाखर व पंचक्रोशी मध्ये ‘शिवाजीतात्या’ म्हणून परिसरात ओळख होती. निमसाखर ग्रामपंचायतच्या अठरा वर्ष सरपंच पदी राहुन दरम्यानच्या काळात गोरगरिबांना न्याय देण्याचे काम शिवाजी तात्यां कडून झाले असुन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक सोय व्हावी या यासाठी काढण्यात आलेल्या इंदापूर तालुका ग्राम विकास प्रतिष्ठानचे संस्थापक विश्वस्त म्हणुन अखेर पर्यंत काम पाहिले आहे.
शिवाजी तात्या यांच्या निधनाचे वृत्त समजतात परिसरातील सर्व व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवून दुखवटा पाळत तात्यांना श्रद्धांजली वाहिली.दरम्यान अंत्यविधीला राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी उपस्थित राहुन रणवरे कुटुंबाचे सांत्वन केले.