
लोकशासन : प्रतिनिधी-इंदापूर ग्रामीण
इंदापूर : (ता.२९) सध्या नगरपरिषदेच्या निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले असून नेत्यांकडून एकमेकांवर अगदी वैयक्तिक पातळीवर टीकास्त्र डागले जात आहे.इंदापूर राष्ट्रवादी काॅग्रेस (अप) चे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे यांच्याकडून प्रविण माने यांच्या वर टिका करताना त्यांनी माने यांना जीभ हासडून टाकण्या धमकी वजा इशारा दिला.कोकाटे यांच्या या वक्तव्याचा खरपुस समाचार घेत प्रविण माने यांनी कोकाटे यांची जुनी प्रकरणे उकरून काढत कोकाटे व त्यांच्या नेत्यांकडून किती लोकांच्या हाताला काम दिले असा सवाल करत माने परिवारा वर बोलण्याचा नैतिक अधिकार नसल्याचे सांगीतले.
प्रविण माने व माने परिवार यांच्या वर बोलण्याची लायकी कोकाटेची नसुन आमच्या नेत्वृत्वावर टिका करणार्यानी मर्यादेत राहून बोलावे अन्यथा त्यांच्या पैक्षा खालच्या पातळीवर जाऊन टिका आम्ही देखील करू शकतो असा सज्जड इशारा भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष राजकुमार जठार यांनी दिला आहे.यावेळी बोलताना राजकुमार जठार म्हणाले की भरणे यांनी आपल्या तालुकाध्यक्षाला समजवावे अन्यथा आम्हाला देखील सगळ्यांचीच अंडी पिल्ले माहीत आहेत. बाहेर काढायला जास्त वेळ लागणार नाही.
इंदापूर नगरपालिकेच्या निवडणुकीत तापलेले वातावरण आणखी कोण कोणती वळणे घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.