इंदापूर नगरपालिकेचा विकास होणार प्रदिप गारटकरच होणार नगराध्यक्ष- महादेव जानकर

Spread the love

लोकशासन- प्रतिनिधी:संजय शिंदे,इंदापूर ग्रामीण

इंदापूर – संपूर्ण पुणे जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात इंदापूर नगरपालिकेची निवडणूक गाजत असून संपूर्ण राज्याचे या निवडणुकीकडे लक्ष लागले आहे.यातच राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी इंदापूर मध्ये येऊन प्रदीप गारटकर यांना जाहीर पाठिंबा दिला आहे.

यावेळी जानकरांनी इंदापूरकरांना भावनिक साद घालत हात जोडून विनंती केली आहे की, गारटकर है अतिशय चारित्र्यसंपन व्यक्ती असून त्यांच्यावर सतत अन्याय झाला आहे, गारटकर हे कुशल संघटक असून अतिशय प्रामाणिक व्यक्ती आहे. या व्यक्तीने रक्तदानाच्या स्वरूपात रक्त उपलब्ध करून देऊन अनेक व्यक्तींचे जीव वाचवले आहेत, रात्रीच्या एक बाजता जरी या माणसराला तुम्ही मदत मागितली तर हा माणूस अध्या रात्रीला मदतीसाठी उपलब्ध असतो. त्यांचे सामाजिक आणि राजकीय कार्य अतिशय चांगले आहे.मला जरी बारामती आणि इंदापूरकरांनी लोकसभेला मतदान कमी दिले असले तरी मी आनंदी आहे, परंतु माझ्या लोकसभेच्या पराभवाचा बदला घ्यायचा असेल तर प्रदीप गारटकरांना आणि त्यांच्या सर्व नगरसेवकांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे अशी कळकळीची विनंती केली.

तसेच माजी, सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील आणि प्रवीण माने यांनी देखील गारटकर यांना पाठिंबा दिल्याबद्दल धन्यवाद देत त्यांचे आभार मानले.तसेच मी सांगता सभेला येणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रदीप गारटकर बानी महादेव जानकर यांना पाठिंबा दिल्याबद्दल आणि आम्हाला इंदापूर मध्ये मेऊन आशीर्वाद दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले, गारटकर म्हणाले की जानकर साहेबांचा हात पाठीवर पडल्याने माझे मनोचल बाढले असून, मला तीन हत्तीचे बळ आले आहे. आणि त्यामुळे माझा विजय हा निश्चित आहे. यावेळी कृष्ण-भीमा विकासआघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button