
लोकशासन – प्रतिनिधी:पुणे ग्रामीण
पुणे – (ता.२२) सध्या नगरपालिका,महानगरपालिका, जिल्हा परिषदे सह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असुन होणाऱ्या या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षा मध्ये समन्वय साधण्यासाठी बारामती दक्षिण च्या जिल्हा निवडणूक संचालन समिती निवडणूक समन्वयक पदाची जबाबदारी प्रविण माने यांच्या वरती सोपविण्यात आली आहे.
जिल्ह्यातील महायुतीच्या सर्व मित्रपक्षांमध्ये योग्य समन्वय, संवाद आणि संघटनात्मक बळकटी निर्माण करण्यासाठी भारतीय जनता पार्टी जिल्हा निवडणूक संचालन समिती स्थापन करण्यात आली असून भारतीय जनता पार्टी व मित्रपक्षा मध्ये समन्वय साधण्याची जबाबदारी या समिती वरती राहणार आहे.
इंदापूर तालुक्याचे भाजप नेते प्रविण माने यांच्या वरती समन्वय साधण्यासाठी बारामती दक्षिण च्या समन्वयकांची मोठी जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8007108688