इंदापूर तालुक्यातील विद्यार्थ्यांची सुरक्षा रामभरोसे !

Spread the love

लोकशासन- प्रतिनिधी:गणेश गुप्ते,भवानीनगर

भवानीनगर: (ता.२१) इंदापूर तालुक्यामध्ये अनेक शाळांमध्ये सीसीटीव्हीच नसल्याने विद्यार्थ्यांची सुरक्षा रामभरोसे असल्याचे चित्र सध्या इंदापूर तालुक्यामध्ये आहे.

इंदापूर तालुक्यातील अनेक शाळा शासनाने दिलेल्या नियमावलीला केराची टोपली दाखवत आहेत.
यामध्ये शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षक यांनी मिळून या उपायोजना करणं आवश्यक असल्याचे शासनाने म्हटले आहे.मात्र इंदापूर तालुक्यात वस्तुस्थिती वेगळीच दिसत आहे अनेक शाळांमध्ये सीसीटीव्हीच नाहीत त्यामुळे मुलं व मुली यांची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे चित्र आहे.याबाबत अनेक शाळांबरोबर चर्चा केल्यानंतर शिक्षकांनी नाव न छापण्याच्या अटीवर माहिती दिली की ज्या ज्या शाळांमध्ये सीसीटीव्ही नाहीत अशा ठिकाणची जबाबदारी आमच्यावर दिलेली आहे मात्र याचा खर्च आम्ही कुठून करू असा प्रश्न शिक्षकांनी उपस्थित केला आहे.

सीसीटीव्ही नेमके बसवणार कोण असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे? याबाबत मात्र पालकांमध्ये संतापाची लाट आहे.मात्र ज्या ज्या ठिकाणी सीसीटीव्ही नाहीत अशा इंदापूर तालुक्यातील सर्व शाळांमध्ये सुरक्षेतेच्या दृष्टीने तात्काळ सीसीटीव्ही बसवण्यात यावेत अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे इंदापूर तालुका उपाध्यक्ष नाना कदम , गणेश जाधव, गणेश भिसे, रसूल पठाण, यांनी ई-मेल द्वारे जिल्हाधिकारी यांना केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button