सुट्टीच्या दिवशी देखील भरता येणार वीजबिल ! सुट्टीच्या दिवशी वीजबिल भरणा केंद्रे सुरू राहणार.

Spread the love

लोकशासन-प्रतिनिधी: संजय शिंदे,इंदापूर ग्रामीण

चालू आर्थिक वर्ष संपण्यास केवळ ३ दिवस शिल्लक असून, बारामती परिमंडलामध्ये वीजबिल वसुलीची धडक मोहीम सुरु आहे. ग्राहकांना चालू व थकीत वीजबिलांचा भरणा करणे सोयीचे व्हावे यासाठी बारामतीसह सातारा व सोलापूर मंडलातील महावितरणचे सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्र शनिवार (दि. २९) व रविवार (दि. ३०) व सोमवार (दि. ३१) या सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी कार्यालयीन वेळेत सुरू राहणार आहेत.

या आर्थिक वर्ष अखेरीस रविवारी (दि. ३०) गुढीपाडवा व सोमवारी (दि. ३१) रमजान ईदची सार्वजनिक सुट्टी आली आहे. या सुटीच्या दिवशीही ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी महावितरणने वीजबिल भरणा केंद्रे सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. थकबाकीसाठी वीजपुरवठा खंडित केला जात असुन, खंडित केलेला वीजपुरवठा पुन्हा जोडण्यासाठी ग्राहकांना थकबाकीसह पुनर्जोडणी शुल्क जीएसटीसकट भरावे लागणार आहे. घरबसल्या ऑनलाईन वीजबिल भरण्यासाठी ग्राहकांनी www.mahadiscom.in या संकतेस्थळाचा तसेच महावितरणच्या मोबाईल अॕपचा वापर करावा.

याशिवाय भीम, गुगल पे, फोन पे सारख्या विविध युपीआय अॕपद्वारेही वीजबिल सहज भरता येते.पाच हजार रुपयांपेक्षा अधिक बिल असणाऱ्या सर्व लघुदाब ग्राहकांना RTGS किंवा NEFT द्वारे देयक भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. त्यासाठीचा आवश्यक तपशिल संबंधित ग्राहकांच्या वीजबिलावर उपलब्ध आहे. ग्राहकांनी संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी वीजबिलांचा भरणा वेळेत करुन महावितरणला सहकार्य करावे असे आवाहन शाखा अभियंता भिगवण वैभव भुजबळ यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button