शिरसटवाडी परीसरात स्मशानभूमी व ओढ्या जवळ टाकल्या जात आहेत पोल्ट्री च्या मृत्य कोंबड्या !

Spread the love

लोकशासन

इंदापूर तालुक्यातील शिरसटवाडी गावातील स्मशानभूमी व स्मशानभूमी जवळ असलेल्या ओढ्या जवळ पोल्ट्री च्या मृत्य अवस्थेतील कोंबड्या पोती भरून टाकल्या जात आहेत.इंदापुर तालुक्यातील शिरसटवाडी, रणगाव,निमसाखर व हगारेवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात पोल्ट्री व्यवसाय असून पोल्ट्री व्यवसायाच्या माध्यमातून या परिसरात अनेक मंडळी आपला उदरनिर्वाह करतात मात्र स्वतःचा उदरनिर्वाह करीत असताना लोकांच्या जीवाशी खेळणे कितपत योग्य आहे याचा देखील विचार या पोल्ट्री व्यवसायीकांने करणे आवश्यक आहे.

अशा प्रकारे पोल्ट्री च्या मृत्य कोंबड्या उघड्यावर टाकल्याने लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असुन सार्वजनिक आरोग्य व पशुवैद्यकीय विभागाने या प्रकरणाची खोलवर चौकशी करून या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी शिरसटवाडी-रणगाव परीसरातुन केली जात आहे.

सध्या बर्ड फ्ल्यू सह अनेक संसर्गजन्य आजारांच्या साथी सातत्याने पसरत असून अशा प्रकारे पोल्ट्री च्या मृत्य कोंबड्या स्मशानभूमी जवळ टाकल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.ज्या ठिकाणी या मृत्य कोंबड्या टाकल्या जात आहेत तेथून अगदी हाकेच्या अंतरावर मोठा ओढा असुन या ओढ्याचे पाणी शेती व जनावरांच्या पिण्यासाठी वापरले जाते तर या ओढ्या लगतच ग्रामपंचायतीची विहीर देखील आहे.त्यामुळे या प्रकरणाची खोलवर चौकशी करून दोषींवर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे.

मृत्य अवस्थेतील कोंबड्या अशा प्रकारे फेकून देण्याचे कारण या कोंबड्या रोगग्रस्त तर नाहीत ना ? आणि या कोंबड्या मरण्याचे कारण नेमके काय असेल जर कोंबड्या मरत आहेत तर पशुवैद्यकीय विभागाला या गोष्टींची माहिती नाही. का कि पशुवैद्यकीय विभाग देखील कोणाच्या दबावाखाली काम करत आहे. का असे अनेक प्रश्न उपस्थित होतात.या कोंबड्या गावातील भटकी जनावरे खात असुन त्या गावात इतरत्र देखील अस्ताव्यस्त पडत आहेत.

One thought on “शिरसटवाडी परीसरात स्मशानभूमी व ओढ्या जवळ टाकल्या जात आहेत पोल्ट्री च्या मृत्य कोंबड्या !

  1. आशा चुकीच काम करणाऱ्या पोल्ट्री व्यावसायिकांवर कारवाई होणे गरजेचे आहे. संबंधीत करार कंपन्यांना समज देणे ही तितकेच गरजेचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button