
लोकशासन – प्रतिनिधी:दौंड ग्रामीण
दौंड– (ता.०७) पाटस अष्टविनायक महामार्गावरील सुप्रसिद्ध जगदंबा हॉटेल येथे गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत एकूण नऊ जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
घटनेची माहिती मिळताच दौंड पोलीस निरीक्षक गोपाळ पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला आहे.दरम्यान, दौंड नगर परिषदेच्या अग्निशामक दलाने तातडीने घटनास्थळी दाखल होत पाण्याचा मारा करून आग नियंत्रणात आणली आहे.जखमींवर उपचार सुरू असून घटनेबाबत अधिक तपास चालू आहे.